पंतची एन्ट्री, राहुलची वाट बिकट; T20 वर्ल्डकप संघात निवड कठीण; कारण काय?
KL Rahul News : आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली (T20 World Cup 2024) आहे. ही स्पर्धा जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. मात्र कोणत्या खेळाडूंची निवड होऊ शकते याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वर्ल्डकपसाठी विचार होईल याची शक्यता दिसत नाही. आयसीसीने 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यासाठी 1 मे मुदत निश्चित केली आहे. दरम्यान, या यादीत केएल राहुलचं नाव आहे मात्र तरीही त्याला अंतिम 11 खेळाडूंत स्थान मिळवणे कठीण होणार आहे.
या मागचं महत्वाचं कारण म्हणजे यंदा स्पर्धा वाढली आहे. खेळाडूंची संख्या जास्त आहे त्यातून खेळाडू निवड करायचे आहेत. दुसरीकडे अपघातात जखमी झालेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही मैदानात परतला आहे. त्याला संघात संधी मिळण्याची जास्त शक्यता दिसत आहे. तसेच रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यांपैकी एकाला संधी मिळू शकते. त्यामुळे केएल राहुलची संघात निवड होण्याची शक्यता कमी होत चालली आहे.
KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’ सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन
हार्दिक पांड्या महत्वाचा खेळाडू आहे. परंतु, तो सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. टी 20 स्पर्धे त्याची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तरीदेखील संघात त्याची निवड होईल यात शंका नाही. तसेच विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, सिराज, कुलदीप यादव यांची निवड निश्चित मानली जात आहे.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचा विचार केला तर गिलने सध्याच्या टी 20 स्पर्धेत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तर जैस्वालही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. या दोघांतून एकाची निवड करणे निवडकर्त्यांसाठी कसरतीचे ठरणार आहे. जर दोघांचीही निवड झाली तर रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यांपैकी एका जणाचा पत्ता कट होऊ शकतो.