राहुलच्या यंग ब्रिगेडचा शानदार विजय, अर्शदीपचा ‘पंजा’ तर सुदर्शनची ‘हाफ सेंचुरी’
IND vs SA : एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघे 2 गडी गमावून सामना जिंकला. प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी धातक गोलंदाजी केली. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी फलंदाजी केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 116 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने 17 व्या षटकातच हे लक्ष्य गाठले.
भारताकडून साई सुदर्शनने (Sai Sudarshan) शानदार फलंदाजी करत नाबाद 55 धावा केल्या. त्याने 43 चेंडूंचा सामना करत 9 चौकार मारले. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 45 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. याआधी अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली. अर्शदीपने 10 षटकात 37 धावा देत 5 विकेट घेतल्या. आवेश खानने 8 षटकात 27 धावा देत 4 विकेट घेतल्या. कुलदीप यादवलाही एक विकेट मिळाली.
Animal Movie Marathi Seen : आधी नकार नंतर होकार, उपेंद्रनं असा साकारला ‘अॅनिमल’चा ‘फ्रॅडी’ !
जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली.
टीम इंडियासमोर आफ्रिकेची दाणादाण, 116 धावांत ऑलआऊट
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने लवकरच सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (5) विकेट गमावली. पण यानंतर श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्यात 88 धावांची भागीदारी झाली. श्रेयस अय्यर 111 धावांवर बाद झाला. त्याने 45 चेंडूत 52 धावा केल्या. साई सुदर्शन 43 चेंडूत 55 धावा करून तिलक वर्मा (1)वर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 16.4 षटकांत 2 विकेट गमावून पराभव केला.