RSA vs ENG : टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत (T20 World Cup 2024) आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (RSA vs ENG) यांच्यात थरारक सामना पाहण्यास मिळाला. दक्षिण आफ्रिकेने फक्त सात धावांनी सामना जिंकला. या सामन्यात एक वेळ अशी आली होती की इंग्लंड सहज जिंकेल असे वाटत होते. परंतु हा विजय त्यांच्या नशिबात नव्हता. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला फक्त 156 धावा करता आल्या. या विजयानंतर दक्षिण आफ्रिका सेमी फायनलच्या (South Africa) अगदी जवळ येऊन ठेपला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 65 रन केले. शेवटच्या ओव्हर्समध्ये डेव्हिड मिलरने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 रन केले. याआधी इंग्लंडने नाणेफेक (England जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीत चांगली सुरूवात केली होती. नंतर मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत सामन्यात वापसी केली. आफ्रिकेच्या फलंदाजांनी जोफ्रा आर्चरची गोलंदाजी फोडून काढली मात्र त्याने तीन विकेट देखील घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा ‘पाणी’दार विजय! वॉर्नर-कमिन्स चमकले, पराभवाने बांग्लादेशची वाट बिकट
नंतर दक्षिण आफ्रिकेने दिलेले 164 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीलापासून इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण आणले. कागिसो रबाडाने फिल सॉल्टला 11 धावांवर बाद करत इंग्लंडला पाहिला धक्का दिला. यानंतर केशव महाराजने जॉनी बेयरस्टो (16) आणि जोश बटलर (17) या दोघांना झटपट बाद करत इंग्लंडच्या अडचणी आणखी वाढवल्या.
यानंतर लियम लिव्हिंगस्टन आणि हॅरी ब्रुक यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 42 चेंडूत 78 धावांची मोठी भागीदारी केली. यामुळे इंग्लंड विजयी होण्याची शक्यता वाढली. यानंतर लिव्हिंगस्टन 33 रनवर बाद झाला. हॅरी ब्रुकनेही नाबाद 52 धावा केल्या होत्या. यानंतर सामन्याच्या विसाव्या ओवरमध्ये पहिल्याच चेंडूवर ब्रुक कॅच आऊट झाला. आफ्रिकेचा कॅप्टन एडनचा आफ्रिकेच्या मार्करमने उलट्या पावलांनी धाव घेत शानदार कॅच घेतला. यामुळे सामना परत आफ्रिकेच्या बाजूने झुकला.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची फलंदाजी चांगली झाली. इंग्लंडकडे जोश बटलर आणि फिल सॉल्ट सारखे आघाडीचे फलंदाज होते. तसेच संघात अन्य काही चांगले फलंदाज आहेत. वेगवान गोलंदाजीच म्हटल तर दक्षिण आफ्रिका कायमचं इंग्लंडला भारी भरतो. इंग्लंडचे जॉफ्रा आर्चर आणि मार्क वूड चांगली गोलंदाजी करतात. मात्र तरीही सांघिक कामगिरी करत आफ्रिकेने सामना जिंकला.
नवख्या अमेरिकेचा बांग्लादेशला झटका; पहिल्याच सामन्यात विजय मिळवत रचला इतिहास