नवख्या अमेरिकेचा बांग्लादेशला झटका; पहिल्याच सामन्यात विजय मिळवत रचला इतिहास

नवख्या अमेरिकेचा बांग्लादेशला झटका; पहिल्याच सामन्यात विजय मिळवत रचला इतिहास

USA vs BAN : टी 20 विश्वचषक सुरू होण्याआधीच क्रिकेटमध्ये मोठा (USA vs BAN) उलटफेर पाहण्यास मिळाला आहे. क्रिकेटमध्ये अगदीच नवखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संघाने चक्क बांग्लादेशचा पराभव केला. अमेरिकेचा बांग्लादेश विरोधातील हा पहिलाच विजय आहे. या सामन्यात मुंबईत जन्मलेल्या हरमित सिंहने जबरदस्त कामगिरी केली. या कामगिरीची दखल घेत त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

टी २० विश्वचषक १ जूनपासून (T20 World Cup 2024) अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशात होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी बांग्लादेशचा संघ येथे दाखल झाला आहे. या स्पर्धेआधी दोन्ही संघात तीन टी २० सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेने बांग्लादेशचा पाच विकेट्सने पराभव केला.

ह्यूस्टन येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने १५३ रन केले. तौहीद हृदॉयने सर्वाधिक ५८ रन केले. सौम्य सरकारने २० तर लिटन दासने १४ रन केले. गोलंदाजीत अमेरिकेच्या अष्टपैलू खेळाडू स्टीव्हन टेलरने दोन विकेट्स घेतल्या.

T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकेच्या संघाने चांगली कामगरी केली. स्टीव्हन टेलरने २८ रन केले. कर्णधार मोनांक पटेलने १२ रन केले. यानंतर स्टीव्हन टेलर आणि अँड्रीज गौस या दोघांनी मिळून ३८ धावांची भागीदारी केली. मधल्या ओव्हर्समध्ये मात्र अमेरिकेच्या विकेट्स लवकर पडल्या. त्यामुळे संघ दडपणात आला होता.

एका वेळी तर ५ बाद ९४ रन अशी अवस्था झाली होती. त्यावेळी असे वाटत होते की बांग्लादेशने वापसी केली. परंतु, हरमित सिंह आणि कोरी अँडरसन या दोघांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी ६२ धावांची विजयी भागीदारी केली. यामुळे पहिल्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करता आला. कोरी अँडरसनने ३४ आणि हरमित सिंहने ३३ रन करत संघाला विजय मिळवून दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज