Team India Home Season Schedule : भारतीय संघ (Team India) टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये शानदार कामगिरी करत या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. आज भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपला पहिला सामना अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज (20 जून) रात्री आठ वाजता सुरु होणार आहे.
तर दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. होय, बीसीसीआयने मोठी घोषणा करत भारतीय संघाच्या टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतरच्या आगामी मालिकांचं वेळापत्रक जाहीर केला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर बांग्लादेश, न्यूझीलंड आणि इंग्लड भारत दौऱ्यावर येणार आहे.
भारतीय संघ या तीन संघाविरोधात 5 मालिका खेळणार आहे. त्यामध्ये दोन कसोटी मालिका, दोन टी ट्वेन्टी मालिका आणि एक वनडे मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कपनंतर झिंबाब्वे आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ झिंबाब्वे विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका आणि श्रीलंका विरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे.
त्यानंतर भारतीय संघाच्या होम सीझनची सुरुवात होणार आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेश विरोधात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे तर ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरोधात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल 2025 होणार आहे. तर दुसरीकडे डिसेंबरमध्ये भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या 5 कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडिया होम सीझन वेळापत्रक
19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पहिली कसोटी, चेन्नई
27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, दुसरी कसोटी, कानपूर
6 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पहिली T20, धरमशाला
9 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, दुसरी T20, दिल्ली
जनतेचा कौल मान्य मात्र कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे ईव्हीएम तपासणी, सुजय विखेंनी स्पष्ट केली भूमिका
12 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, तिसरी T20, हैदराबाद