जनतेचा कौल मान्य मात्र कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे ईव्हीएम तपासणी, सुजय विखेंनी स्पष्ट केली भूमिका

जनतेचा कौल मान्य मात्र कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे ईव्हीएम तपासणी, सुजय विखेंनी स्पष्ट केली भूमिका

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या (Ahmednagar Lok Sabha Election 2024) चुरशीच्या लढाईत महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा पराभव केला आहे.

तर आता महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मायको कंट्रोलर (EVM Myco Controller) तपासणीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत माहिती येताना सुजय विखे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मायको कंट्रोलर तपासणीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही ही मागणी केली असल्याची माहिती त्यांनी शिर्डीमध्ये (Shirdi) आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. तसेच ही मागणी केवळ आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार करण्यात आली आहे असं देखील सुजय विखे यावेळी म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही उमेदवाराला निकाल लागल्यानंतर 7 दिवसांच्या आत एकूण ईव्हीएम मशीनच्या 5 टक्के मशीनच्या मायक्रो कंट्रोलरची तपासणी करता येते त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना ज्या मतदान केंद्रावर तीव्र शंका होती अशा 40 ठिकाणच्या ईव्हीएमच्या मायक्रो कंट्रोलर मशीनची तपासणीची मागणी रीतसर फी ‘जीएसटी’ सह भरून केली असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पत्रकाराची गुगली अन् राहुल द्रविड संतापलाच; 1997 च्या ‘त्या’ सामन्यात काय घडलं होतं?

तसेच निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौल आपल्याला कालही मान्य होता आणि आजही मान्य आहे. यात कसलेही राजकारण किंवा वेगळा हेतू नाही असे सांगत त्याची केवळ काही ठिकाणच्या कार्यकर्त्यांना त्या-त्या ठिकाणी आलेले निकाल मान्य नव्हते त्यामुळे ज्या ठिकणी कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या अशा ठिकाणच्या ईव्हीएम मशीनच्या मायक्रो कंट्रोलरच्या तपासणीची मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केली आहे. यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये अशी विनंती देखील या पत्रकार परिषदेमध्ये सुजय विखे यांनी केली.

NEET पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव कनेक्शन, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला खबळजनक दावा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज