NEET पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव कनेक्शन, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला खबळजनक दावा

NEET पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव कनेक्शन, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला खबळजनक दावा

Tejashwi Yadav : NEET-UG परीक्षेमुळे (NEET-UG exam) राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेत ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली तसेच आता या प्रकरणात सीबीआय (CBI) चौकशी होणार असल्याची देखील सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) NEET-UG पेपर लीक प्रकरणात सुनावणी सुरु आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा (Vijay Sinha) यांनी NEET-UG पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यावर एक खळबळ जनक आरोप केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी दावा केला आहे की, NEET-UG पेपर लीक करणाऱ्या टोळीतील सदस्य पाटणा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते आणि त्याचे बुकिंग तेजस्वी यादव यांच्या स्वीय सचिवाने केले होते आणि इतकेच नाही तर बुकिंग करताना तेजस्वी यादव यांच्यासाठी मंत्री हा शब्द वापरण्यात आला होता असा दावा विजय सिन्हा यांनी केला आहे.

एका पत्रकार परिषदेमध्ये विजय सिन्हा म्हणाले, 01 मे रोजी तेजस्वी यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम कुमार यांनी रस्ते बांधकाम विभागात कार्यरत प्रदीप कुमार यांना फोन केला होता. हा फोन त्यांनी सिकंदर कुमार यादव यांच्यासाठी रूम बुक करण्याच्या उद्देशाने केला होता. मात्र प्रदीपकुमार यांनी याची कोणतीही दाखल घेतली नाही. त्यानंतर 4 मे रोजी सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा प्रीतम कुमार यांनी त्यांना फोन केला त्यावेळी प्रदीपकुमार यांनी रस्ते बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला होता असं विजय सिन्हा म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, पेपरफुटीच्या प्रकरणाची बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात माहिती गोळा केली जात आहे. तर गेस्ट हाऊसमधून ज्या लोकांशी त्याचे संबंध आहेत त्यापैकी एक प्रीतम आहे. ते तेजस्वी यादव यांच्याशी जोडलेले असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जे कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोणत्या मंत्रीने कोणत्या लोकांसाठी गेस्ट हाऊस वापरले आहे याची देखील माहिती मंत्र्यांना द्यावी लागणार आहे असेही विजय सिन्हा म्हणाले.

इंग्लंडने रोखला विंडीजचा विजयरथ; सुपर 8 मधील सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय

ज्यांचा विनंतीवरून रूम बुक करण्यात आले त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. ही मोठी घटना आहे. आम्ही यापूर्वी देखील सांगतिले आहे की, राजदचे लोक गुन्हेगारी वाढवतात तसेच गुन्हेगारीचे प्रशिक्षण देतात आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन देतात. आता उच्चस्तरीय चौकशीनंतर संपूर्ण प्रकरण उघड होईल असं देखील विजय सिन्हा म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज