Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतही विराट कोहली खेळण्याची शक्यता कमीच आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी आजच भारतीय संघाची (Team India) घोषणा होणार आहे. यानंतर विराट कोहली खेळणार की नाही हे देखील स्पष्ट होईल.
तिसऱ्या कसोटीसाठी विराट संघात परतेल अशी चर्चा सुरू होती. मात्र अजून तरी खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. विराट सध्या विदेशात आहे. संघाचे कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) संघ व्यवस्थापन त्याच्या संपर्कात असून त्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले होते. विराटबरोबरच केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील संघाबाहेर आहेत. या दोघांपैकी एकजण पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार
या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली त्यावेळी या संघात विराटचे नाव नव्हते. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून नाव मागे घेतले होते. बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांसाठी रजेची मागणी केली होती. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली. आता तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध असेल का याबाबत आताच काही सांगता येणार नाही. उर्वरित तीन सामन्यांसाठी संघाची निवड आजच होणार आहे. त्यामुळे विराट कोहली तिसऱ्या सामन्यात असेल का या प्रश्नाचे उत्तरही आजच मिळेल.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने तेही या सामन्यात नाहीत. तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. आता मात्र टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आज तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे.
Virat Kohli : तिसऱ्या सामन्यात विराट खेळणार का? मोठी अपडेट मिळाली