Virat Kohli : तिसऱ्या सामन्यात विराट खेळणार का? मोठी अपडेट मिळाली

Virat Kohli : तिसऱ्या सामन्यात विराट खेळणार का? मोठी अपडेट मिळाली

Virat Kohli IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना विशाखापट्टणम (IND vs ENG) येथे सुरू आहे. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून विराट कोहलीने (Virat Kohli) माघार घेतली होती. तसेच रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने तेही या सामन्यात नाहीत. तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. आता मात्र टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली त्यावेळी या संघात विराटचे नाव नव्हते. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून नाव मागे घेतले होते. बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यांसाठी रजेची मागणी केली होती. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली. आता तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध असेल का याबाबत आताच काही सांगता येणार नाही. उर्वरित तीन सामन्यांसाठी संघाची निवड करण्यासाठी अद्याप वेळ आहे. त्यामुळे विराट कोहली तिसऱ्या सामन्यात असेल का या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

Virat Kohli Bowling : हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त मैदान सोडलं, कोहलीनं पूर्ण केली ओव्हर..

दुसऱ्या सामन्यात ‘यशस्वी’ चमकला 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test) आजपासून विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. या सामन्यात आज पहिल्या दिवशी भारताचे फलंदाज चमकले. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. चहापानापर्यंत भारताने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 225 धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार शतक ठोकर संघाच्या फलंदाजीला आकार दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज