Womens India T20 World Cup 2024 : आगामी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक (Women’s T20 World Cup 2024) आयसीसीने प्रसिद्ध केले होते. आता मात्र या वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक जारी कमरण्यात आले आहे. हा वर्ल्डकप बांग्लादेशातच होणार होता. मात्र येथील हिंसाचाराची परिस्थिती लक्षात घेता स्पर्धा युएईत होणार आहेत. या स्पर्धा बांग्लादेशात व्हाव्यात यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. या स्पर्धेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. स्पर्धेतील पहिला सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. तर अंतिम सामन 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीतील सामने होतील.
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 🗓️#TeamIndia‘s schedule for the ICC Women’s #T20WorldCup 2024 is 𝙃𝙀𝙍𝙀 🔽 pic.twitter.com/jbjG5dqmZk
— BCCI Women (@BCCIWomen) August 26, 2024
आधीच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघाचा तिसरा सामना 8 ऑक्टोबरला होणार होता. आता मात्र हा सामना 9 ऑक्टोबरला होणार आहे. सुधारित वेळापत्रकात काही सामन्यांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाचा पहिला सामना होणार आहे. साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. तिसऱ्या सामन्यात श्रीलंका आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानशी टक्कर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे.
T20 World Cup 2025 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचा पहिला सामना कधी? जाणून घ्या..
विश्वचषकातील भारताचे सामने
4 ऑक्टोबर
भारत वि. न्यूझीलंड
6 ऑक्टोबर
भारत वि. पाकिस्तान
9 ऑक्टोबर
भारत वि. श्रीलंका
13 ऑक्टोबर
भारत वि. ऑस्ट्रेलिया
साखळी फेरीतील सामन्यांचे हे वेळापत्रक आहे. याआधी भारताचे दोन सराव सामने होणार आहे. या सामन्यांत भारतीय संघ वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिकेला टक्कर देणार आहे. पहिला सराव सामना 29 सप्टेंबर रोजी वेस्टइंडिज विरुद्ध होईल तर दुसरा सराव सामना 1 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे. टी 20 वर्ल्डकप पुरुष संघाने जिंकला आता महिला संघही दमदार कामगिरी करून विश्वचषक पटकावील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ एलार्डिस यांनी सांगितले, बांग्लादेशमध्ये महिला टी20 वर्ल्डकप आयोजन करू शकत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून आयोजनाबाबत तयारी करण्यात आली होती. ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये कशी घेता येईल, याबाबत अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतु ही स्पर्धा आता दुसरीकडे भरवली जाणार आहे. त्यासाठी यूएईचा पर्याय अंतिम करण्यात आला आहे. या स्पर्धेचे आयोजक बांग्लादेश क्रिकेट बोर्डच असणार आहे. भविष्यात आसीसीकडून बांग्लादेशमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतील.
आयटी अन् मॅकेनिकल इंजिनिअर, UPSC ही केली क्रॅक.. भारताचे क्रिकेटर्स शिक्षणातही अव्वल