Download App

World Cup 2023 : हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानची दाणादाण, 191 धावांवर ऑलआउट

IND vs PAK : वर्ल्ड कपमधील महामुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजारी असल्याने पहिल्या दोन सामन्यात शुभमन गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आज भारतीय संघात इशान किशनऐवजी शुभमन गिलला संघात स्थान मिळाले आहे. चांगली सुरुवात झाल्यानंतरही भारतीय गोलंदाजापुढे पाकिस्तानने नांग्या टाकल्या. 42.5 षटकात त्यांची संपूर्ण टीम 191 धावांवर ऑलआउट झाली आहे.

पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोहमद रिझवाने 49 धावा केल्या. त्यानंतर एकाही पाकिस्तानच्या खेळाडूला भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीवर जास्व वेळ टिकून दिले नाही. भारताकडून सिराज, बुमराह, कुलदीप, हार्दिक आणि जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारतीय संघापुढे 192 धावांचे आव्हान आहे.

Virat Kohli: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटने घातली भगतीच जर्सी, नेमकं काय घडलं?

चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42.5 षटकांत 191 धावा केल्या. संघाला पहिला झटका 41 धावांवर लागला होता. शफिक 20 धावा करून बाद झाला होता. यानंतर इमाम उल हक 36 धावा करून बाद झाला. इमाम आणि शफीक बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण फार काळ ते भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकले नाही. बाबरने 58 चेंडूत 50 धावा केल्या. रिझवानने 49 धावा केल्या. रिझवानने 7 चौकार मारले.

पाकिस्‍तानचा डाव पत्‍त्‍यासारखा कोसळला
बाबर आणि रिझवान बाद झाल्यानंतर संघ पत्त्यासारखा कोसळला. इफ्तिखार अहमद 4 धावा करून बाद झाला. शादाब खान 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद रिझवान 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हसन अली 12 धावा करून बाद झाला, शाहीन आफ्रिदी 2 धावा करून नाबाद राहिला. अशा प्रकारे संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.

भारताने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी का निवडली? नाणेफेकीनंतर रोहितने सांगितले कारण

भारताची घातक गोलंदाजी
अहमदाबादमध्ये भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहने 7 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. त्याने एक मेडन ओव्हर टाकली. मोहम्मद सिराजने 8 षटकात 50 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 6 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. कुलदीप यादवने 10 षटकात 35 धावा देत 2 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 9.5 षटकात 38 धावा देत 2 बळी घेतले.

Tags

follow us