Download App

IND vs NZ Semifinal: टीम इंडियाच्या 9 सामन्यात 75 विकेट आणि 2300 हून अधिक धावा

World Cup 2023: वर्ल्ड कपचा (World Cup 2023) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात होणार आहे. दुसरा सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होणार आहे. टीम इंडियाचा सेमीफायनल मुंबईतील वानखेडेवर होणार आहे. या विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी 2300 हून अधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजांनी एकूण 75 विकेट घेतल्या आहेत. गेल्या 9 सामन्यातील ही कामगिरी आहे.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी 2300 हून अधिक धावा केल्या
टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.एका शतकासोबत त्याने 503 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने 270 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विराट कोहलीने दोन शतकांसह 594 धावा केल्या आहेत. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. श्रेयस अय्यरने एका शतकासह 421 धावा केल्या आहेत. नेदरलँडविरुद्ध अय्यरची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड करण्यात आली.

World Cup 2023 : नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा; विराट, रोहित शर्माने घेतल्या विकेट

संघाच्या मधल्या फळीवर नजर टाकली तर येथेही चांगले कामगिरी दिसून आली आहे. केएल राहुलने 347 धावा केल्या आहेत. त्याने नेदरलँडविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. सूर्यकुमार यादवने एकूण 87 धावा केल्या. त्याला विशेष काही करता आले नाही. रवींद्र जडेजाने एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली. 111 धावा करण्यासोबतच त्याने 16 विकेट्सही घेतल्या आहेत.

world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा पूर्ण; विराटने घेतली नऊ वर्षानंतर नववी विकेट

भारतीय गोलंदाजांनी 75 विकेट घेतल्या
टीम इंडियाचे गोलंदाजी आक्रमण खूपच घातक बनले आहे. जसप्रीत बुमराहने 17, कुलदीप यादवने 14 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमीने 16 विकेट घेतल्या आहेत. शमीलाही सामनावीर म्हणून निवडण्यात आले आहे. मोहम्मद सिराजने 12 विकेट घेतल्या. अशाप्रकारे या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी आतापर्यंत 75 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजांनी 2300 हून अधिक धावा केल्या आहेत. आता भारतीय खेळाडू उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरतील. भारताविरुद्ध विजय मिळवणे न्यूझीलंडसाठी सोपे नसेल.

Tags

follow us