Download App

चंद्रकांतदादा, फडणवीसांसह 9 जणांचे मतदारसंघ ठरले; सहा विद्यमान मंत्र्यांना डच्चू?

BJP Chandrakant Patil Maybe contest from Kothrud : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या (Assembly Election 2024) आहेत. चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहेत. समोर आलेल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचादेखील मतदारसंघ निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीसांसह (BJP) 9 जणांचे मतदारसंघ ठरल्याचे सांगितले जात आहे. यात सहा विद्यामान मंत्र्यांना पहिल्या यादीतून डच्चू दिल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. मात्र, समोर आलेली उमेदवारांची नावांवर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दिल्लीतील महायुतीच्या बैठकीमध्ये 120 जणांच्या नावांवर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Assembly Election : 9. 63 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार; पुरुष अन् महिला किती?

दरम्यान भाजप नेत्यांनी विधानसभेसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केलीय. यामधील 9 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या नावांमध्ये सहा विद्यमान मंत्र्यांना पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याचं समोर आलंय. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे.

कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

नंदूरबार विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार गावित, नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सुभाष भामरे, धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनुप अग्रवाल,  भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संजय सावकारे, जळगाव विधानसभा मतदारसंघातून सुरेश भोळे, शहादा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी, सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून जयकुमार रावल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

BJP Candidates List : हरियाणात भाजपचे 67 शिलेदार ठरले; पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असुन इच्छुक उमेदवारांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी उरलेला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत असून, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेकडून उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे.

 

follow us