Download App

“नाट्य परिषद करंडक” ची अंतिम फेरी संपन्न! ‘नाट्यशृंगार, पुणे’ च्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ने मारली बाजी

Natya Parishad Karandak अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 'नाट्य परिषद करंडक' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • Written By: Last Updated:

Natyashrungar pune institutes Chiranjiv perfect bighdlay wind in Natya Parishad Karandak : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव ‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

राज्यातील तरूणांना एसटीमध्ये नोकरीची संधी! 17,450 चालक व सहाय्यक भरले जाणार…

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये संपन्न झाली. दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध 19 केंद्रांवर प्राथमिक फेरी घेण्यात आली. यातील निवडक 25 एकांकिकेची अंतिम फेरी दिनांक 15, 16, 17 व 18 सप्टेंबर 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे संपन्न झाली.

रसिकांच्या मनात घर केलेलं ‘शेवग्याच्या शेंगा’ सदाबहार नाटक पुन्हा रंगभूमीवर!

नाट्य परिषदेने अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी त्यांच्या गावी जाऊन नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले. सदर कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून कुमार सोहोनी, संतोष पवार, राजीव तुलालवार, अद्वैत दादरकर, संतोष वेरुळकर, विजू माने, गणेश रेवडेकर, अमेय दक्षिणदास, प्रताप फड, मंगेश सातपुते, महेंद्र तेरेदेसाई, सचिन शिंदे, प्रदीप वैद्य, विश्वास सोहोनी ह्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले.

‘वडापाव’ टीमचा स्तुत्य उपक्रम! मेगा क्लिन अप ड्राइव्हमधून केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

उत्साहपूर्ण वातावरणात, अनेक नाविन्यपूर्ण विषयांच्या एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या. अंतिम फेरीचे परिक्षक म्हणून विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, सुहास जोशी, रविंद्र पाथरे, सौरभ पारखे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे स्पर्धा समन्वयक म्हणून सतिश लोटके, डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी काम पाहिले.

मोठी बातमी! शिरूरमध्ये माजी आमदाराविरूद्ध गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

सदर अंतिम फेरीसाठी सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, विजय गोखले, संजय मोने, निर्माते दिलीप जाधव हे मान्यवर उपस्थित होते. या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता गवाणकर ह्यांनी केले. दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतिश लोटके, नियामक मंडळ सदस्य विजय गोखले, सयाजी शिंदे, उदय राजेशिर्के, श्री. चंद्रशेखर पाटील, शिवाजी शिंदे, विजय सूर्यवंशी व परीक्षक ह्यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

नागपूर खंडपीठाचा जिल्हा परिषद निवडणुकांना हिरवा कंदील? सर्कलच्या नवीन रोटेशनला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5.30 वाजता नाट्य परिषदेचे विश्वस्त, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, जेष्ठ अभिनेते संजय मोने, दिलीप जाधव इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! नवरात्रीमध्ये ‘या’ पर्यायी मार्गाने करावी लागणार वाहतूक

याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले म्हणाले की, नाटकात काम करण्यासाठी चिकाटी, शिकण्याची जिद्द आणि व्यसनांपासून लांब राहता आलं पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने जो काम करतो त्यावेळीच नाटक छान होतं, जो आपल्या स्वतः साठी करतो त्यावेळी तो एक खांबी तंबू होतो आणि नाटक चालत नाही. नाटकात काम करताना शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. बक्षीस मिळविणाराच हुशार असतो असं नाही तर चांगले काम करणाऱ्यालाच व्यावसायिक रंगभूमीवर काम मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी केले तर आभार उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी आभार मानले.

follow us