Download App

Ladki Bahin Yojana : … तर 27 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही पैसे, ‘हे’ आहे कारण

Ladki Bahin Yojana :  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने (Mahayuti Government) मोठा मास्टरस्टोक खेळत राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण

  • Written By: Last Updated:

Ladki Bahin Yojana :  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने (Mahayuti Government) मोठा मास्टरस्टोक खेळत राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) सुरुवात केली आहे. आतापर्यंत या योजनेत लाखो महिलांचे अर्ज आले आहे. सध्या या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै – ऑगस्ट महिन्याच्या पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी (Rakshabandhan) राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्यात येत आहे.

तर दुसरीकडे या योजनेबाबत एक अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, या योजनेसाठी अर्ज अप्रूव्ह झाला तरी काही महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. याचा मुख्य कारण म्हणजे बँक खात्याचे KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या बँक खात्याचे KYC पूर्ण नसेल त्या बँक खात्यात पैसे जमा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केली आहे तर त्यापैकी 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहे. त्यामुळे उरलेल्या 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. याचा कारण म्हणजे या अर्जदार महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी आतापर्यंत लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही अशी माहिती सध्या समोर येत आहे.

Vinesh Phogat : विनेश फोगटला धक्का, पदक मिळणार नाही, CAS ने याचिका फेटाळली

या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी जुलै 2024  पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकार या योजनेसाठी दरवर्षी  46 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेत  21 ते 60 वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहे.

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये द्या, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

follow us