लाडक्या बहिण योजनेचे एक कोटी अर्ज पात्र, रक्षाबंधनपूर्वीच पैसे होणार जमा; CM शिंदेंची ग्वाही

लाडक्या बहिण योजनेचे एक कोटी अर्ज पात्र, रक्षाबंधनपूर्वीच पैसे होणार जमा; CM शिंदेंची ग्वाही

Eknath Shinde : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamnatri Ladaki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकावर (Mahayuti) जोरदार टीका होत आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधक हे लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत, असा टोला लगावत आतापर्यंत 1 कोटी 5 लाख अर्ज मान्य झाल्याची माहिती शिंदेंनी दिली.

नीरज चोप्रा उद्या उतरणार मैदानात, सेमी फायनलमध्ये जर्मनीशी भिडणार भारत, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

पुरपरिस्थितीमुळे पुण्यातील एकतानगरसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं. त्यानंतर आता सीएम शिंदेंनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत पुरग्रस्तांशी संवाद साधला. महापालिकेकडून जेवणासह सर्व सोयी-सुविधा मिळतात का? याची चौकशी त्यांनी केली. ते म्हणाले, मुळा आणि पवना नद्यांना पूर आल्यानंतर नदीकाठच्या रहिवाशांना दरवर्षी स्थलांतर करावे लागते. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायम स्वरुपी पुनर्वसन करण्याता तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

तसेच लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, महायुतीचा सरकार 24 बाय 7 काम करतं, महाविकास आघाडीने बंद केलेले विकास प्रकल्प महायुती सरकारने सुरु केलेत. एकीकडे विकास प्रकल्प आहे तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसारखी कल्याणकारी योजना सरकार राबवत आहेत. लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ कोर्टात गेले होते. मात्र, कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसा जमा होतील, ही विरोधकांची पोटदुखी आहे, अशी टीका त्यांनी केली.

पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला, सुपारीबाज…; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल 

1 कोटी 5 लाख 9 हजार
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत दीड कोटी पैकी 1 कोटी 5 लाख 9 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत. बाकी देखील अर्ज तपासून ते मान्य केले जातील. रक्षाबंधन अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी ग्वाही शिदेंनी दिली. सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही इतक्या खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडल आहे. आगामी निवडणुकीत त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube