मोठी बातमी! उद्यापासून फास्टॅगच्या नियमांमध्ये होणार बदल, आजच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया नाहीतर…
Fastag KYC Rules : उद्यापासून नवीन महिना सुरु होणार आहे. याच बरोबर देशात काही नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. ज्याचा थेट संबंध सर्वसामान्यांशी येणार आहे. 1 ऑगस्टपासून फास्टॅगच्या (Fastag) नियमांमध्ये बदल होणार आहे. माहितीनुसार, नवीन बदलांचा उद्देश टोल भरण्याची प्रक्रिया आणि टोलनाक्यांवर होणारी गर्दी कमी करणे हा आहे. यामुळे या नवीन नियमांची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2024 पासून करण्यात येणार आहे. जाणून घ्या 1 ऑगस्टपासून फास्टॅगचे कोणते नियम बदलणार आहे.
केवायसी
नवीन फास्टॅग नियमांनुसार आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. यापूर्वी याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र आता याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. याबाबत NPCI ने नवीन मार्गदर्शक तत्व जारी केले आहे. त्यामुळे तुम्हाला आता KYC करून घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. फास्टॅग ग्राहकाला या दरम्यान त्याचे केवायसी पूर्ण झाले आहे याची खात्री करावी लागेल.
काय बदल होतील
जर तुमच्याकडे 5 वर्षपूर्वीचा फास्टॅग असेल तर तुम्हाला नवीन फास्टॅग घ्यावा लागेल. नवीन नियमांनुसार, जर असे असेल तर तुम्हाला तुमचा फास्टॅग देखील बदलावा लागेल. म्हणजेच तुम्हाला तो बदलून नवीन फास्टॅग घ्यावा लागेल.
अपडेट
जर तुमच्याकडे 3 वर्षे जुना फास्टॅग असेल तर तो अपडेट करून घ्यावे लागणार आहे. गाडी नंबर आणि चेसिस नंबर देखील फास्टॅगशी जोडलेला असावा. वाहन खरेदी केल्यानंतर 90 दिवसांच्या आत तुम्हाला आता केवायसी अपडेट करावे लागेल.
या पद्धतीने करा केवायसी
केवायसीसाठी करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या वाहनाची सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यासोबतच वाहन मालकाचे ओळखपत्रही आवश्यक असेल.
केवायसी अपडेट दरम्यान, तुम्हाला वाहनाची फ्रंट आणि रियर फोटो अपलोड करावी लागतील. वापरकर्त्यांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केवायसी पूर्ण करावे लागेल.