Download App

मला सांगायला लाज वाटते पण बीडमध्ये सामाजिक समता आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

Dhananjay Munde : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील सामाजिक समतेवर बोलत आहे. बीड जिल्ह्यात आज पोलिसांना स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. ते बीड जिल्ह्यात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक समात उरली नाही. बीड (Beed) जिल्ह्यात पोलिसांना सुद्धा स्वत:चं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? मला लाज वाटते हे सांगायला पण आता सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे असं या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले.

मोठी बातमी, PM मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाब दौऱ्यावर, पूरग्रस्त भागासाठी करणार घोषणा?

शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची?

या कार्यक्रमात पुढे बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, आपण सर्वांनी आपले महापुरुष बांधून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का? शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्ह तर अठरा पगड जाती धर्मियांसाठी उभं केलं होतं असं धनंजय मुंडे म्हणाले.

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती, लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले

follow us