Download App

…होय आहे मी जातीयवादी; ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना लक्ष्मण हाकेंचं मोठ विधान, पाहा व्हिडिओ

होय आहे मी जातीयवादी अशी परखड भूमिका घेत अमरण उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक प्रश्नांना थेट उत्तर दिली आहेत.

  • Written By: Last Updated:

Laxman Hake Special Interview Letsupp Marathi :  होय आहे मी जातीयवादी. एका जातीची भूमिका घेणारा महामानव असेल तर मी साडेचारशे जातींची भूमिका घेणारा  जातीयवादी आहे अशी थेट भूमिका लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी घेतली आहे. आठरापडगड जातीसाठी लढून जातीयवादी ठरत असेल तर मला हा जातीयवाद मान्य आहे असेही ते म्हणाले आहेत. ते लेट्सअप मराठीशी बोलत होते. (Manoj Jarange) तसंच, जे मिळणारचं नाही त्याची मागणी करणं आणि आपल्या तरुणांना आत्महत्येला प्रवृत्त करणं, ज्या मराठा तरुणांच्या आत्महत्या झाल्या त्या जरांगे यांच्यामुळे झाल्या असा थेट आरोपही हाके यांनी यावेळी केला.

समाधानी नाहीत लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार

जे घटना विरोधी आहे ते कायदा विरोधी आहे. हा ओबीसी आरक्षण संपण्याचा घाट आहे असं म्हणत आम्ही सरकारच्या गुळगुळीत उत्तरांवर आम्ही समाधानी नाहीत असंही यावेळी हाके म्हणाले आहेत. आमच्या चार मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामध्ये ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती हा निर्णय झाला. परंतु, बाकी मागण्यांवर जे उत्तर मिळालं त्यावर आम्ही समाधानी नाहीत असंही ते म्हणाले.

पवार पुरोगामी अजिबात नाहीत

शरद पवारांवर आमचा काही रोष नाही. ते शासक आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करतोय. ते सत्तेत असताना ते लक्ष्मण माने यांना सोबत घ्यायचे. परंतु, त्यांच्या अलिकडील भूमिका न पटण्यासारख्या आहेत असं म्हणत पवार हे पुरोगामी अजिबात नाहीत असा थेट घणाघात हाके यांनी यावेळी केला आहे. तसंच, तुम्हाला काही अपेक्षा आहेत का ? या प्रश्नावर आम्हाला अपेक्षा होत्या. परंतु, आता आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत असंही हाके यावेळी म्हणाले आहेत.

आज तोडगा निघणार? ‘एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठा बांधवांना माझी विनंती आहे. आपण सोबत बसून चर्चा करू. संविधानिक चर्चा करू. यातील महत्वाचे मुद्दे काढू त्यावर चर्चा करू. काय घडलं, याला कोण जबाबदार आहे हे काढू, शाहू फुलेंचा महाराष्ट्र पुन्हा उभा करू असं म्हणत, ओबीसींचं आरक्षण काढून घेतल्याने प्रश्न सुटेल हा समज तुमच्यात जरांगे यांनी रुजवला तो चुकीचा आहे असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, आज येणाऱ्या शिष्टमंडळाशी चर्चा करून तोडगा निघेल का? या प्रश्नावर प्राथमिक बोलण झालय पाहू काय होतय असं हाके यावेळी म्हणाले आहेत.

 

 

 

 

follow us