‘एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

‘एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ओबीसी (OBC) नेत्यांसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे आजची बैठक मॅनेज होती असा आरोप मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीवरून पुन्हा एका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका करत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आजची बैठक मॅनेज होती. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, मराठ्यांना काहीही मिळू द्यायचे नाही यासाठी आजची ही बैठक होती असा आरोप त्यांनी यावेळी केला तसेच तुमची मागणी काय आहे? तुमची मागणी फक्त आमच्यात झुंज लावायची आहे. सरकारमधील ज्या मंत्र्यांनी हे आंदोलन बसवलं आहे त्यांनी ही बैठक मॅनेज केली आहे. त्यांना काहीही मिळाले तर आम्हाला त्याचा त्रास नाही पण जर आम्हाला काही मिळाले की ते विरोध का ? करतात असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, माझ्यासोबत कुणीच नाही जर तुम्हाला वाटतं असेल तुम्ही सरकार आहे मात्र मी तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून सांगतो. मी जनतेसाठी काम करत आहे, म्हणून मी ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाच्या मागण्या मांडत असतो. माझ्या पाठीशी फक्त मराठा समाज आहे. जर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल अशा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला तसेच आमच्या नोंदी खऱ्या आहेत आणि आमची एकही नोंद रद्द झाली तर मंडळ कमिशनने दिलेल्या बोगस आरक्षणावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.

या बैठकीत काय चर्चा झाली ते मला माहिती नाही मात्र आम्हाला आमचे हक्काचे आरक्षण द्यावे. त्यांच्यासाठी समिती असेल तर आमचा काहीच आक्षेप नाही अशी देखील यावेळी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

‘आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका’, नाव न घेता पंकजा मुंडेंनी लावला जरांगे पाटलांना टोला

तसेच छगन भुजबळ यांच्यावर टीका करत जरांगे पाटील म्हणाले, सगेसोयरे रद्द करा म्हणजे तो काहीही बोलतो, त्यानेच सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर टाकल्या आहेत. त्याने जन्मल्यापासून मराठ्यांना विरोध करणे हेच काम केले आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज