‘आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका’, नाव न घेता पंकजा मुंडेंनी लावला जरांगे पाटलांना टोला 

‘आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका’, नाव न घेता पंकजा मुंडेंनी लावला जरांगे पाटलांना टोला 

Pankaja Munde : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) करत आहे तर दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) उपोषण करत आहे. त्यांच्या या मागणीला अनेक ओबीसी नेत्यांनी देखील पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या अडचणीत वाढत होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विट करत आंदोलन कसे करावे हे लक्ष्मण हाकेंकडून शिका असा टोला मनोज जरांगे पाटील यांना नाव न घेता लावला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरी मध्ये पहा…वाह रे वाह.. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके गेल्या सात दिवसांपासून वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत. पंकजा मुंडे यांनी 17 जून रोजी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलनाला भेट दिली होती त्यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला होता. तसेच सरकारमधील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल द्यावी आणि त्यांना सन्मान देऊन उपोषण सोडवावे व न्याय द्यावा अशी मागणी केली होती.

मोठी बातमी! पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना जामीन

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणाचा फटका बसल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी वाढत असल्याने भाजप श्रेष्ठी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

अर्थतज्ज्ञांचा सल्ला करदात्यांना झटका देणार?; अन्य करांसोबत रोबोट टॅक्सही घ्या; अर्थमंत्र्यांकडे मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज