Lok Sabha Elections Maharashtra : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जागावाटप (Lok Sabha Elections) अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखायचे म्हणून इंडिया आघाडी मैदानात आहे. तर दुसरीकडे जास्तीत जास्त आक्रमक प्रचार करून 2024 मध्येच 2029 च्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. परंतु, असे असले तरी काही राज्यात यंदा भाजपला लढाई सोपी नाही. यातीलच एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. या राज्यात सत्ताधारी महायुतीला जोरदार दणका बसणार असल्याचा धडकी भरवणारा अहवाल आला आहे. एबीपी सी व्होटरने महाराष्ट्रात सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात भाजपला धक्का बसताना दिसत आहे.
या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजप एनडीए आणि इंडिया आघाडीत अटीतटीची लढत होणार आहे. दोन्ही आघाडींना प्रत्येकी 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मागील महिन्यातील सर्वेक्षणात एनडीए आघाडीला 43 टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर इंडिया आघाडीला 42 टक्के मते मिळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु, आता टक्केवारी घसरत असल्याचे दिसून येत आहे. आताच्या सर्वेक्षणात राज्यातील अन्य पक्षांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. मागील सर्वेक्षणात अन्य पक्षांना 15 टक्के मते मिळतील असा अंदाज होता. परंतु, नव्या सर्वेक्षणात मात्र या पक्षांना 18 टक्के जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Lok Sabha Election : सुजय विखेंना धमकी देणाऱ्यावर कारवाई करा; महायुतीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
राज्यात मागील दोन वर्षात दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आधी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं. दुसरी घटनाही अशीच घडली. अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड केलं. थोड्या दिवसानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना मिळालं. या घटनांमुळे राज्यात महायुती मजबूत झाली. सत्तेतही वाटा वाढला. यावर लोकसभा निवडणूक चांगल्या मताने जिंकू असे महायुतीचे नेते सांगू लागले. पण, दुसरीकडे या घडामोडींमुळे जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे झुकल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार याचं उत्तर 4 जूनलाच मिळेल.
एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर… विजयासाठी घाम गाळावा लागणार!
बिहार, बंगाल महाराष्ट्रात टफ फाइट
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी 370 जागा आणि एनडीए आघाडीसाठी 400 पारचा नारा दिला आहे. पंरतु, हा टप्पा गाठण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या तीन राज्यांत अवघड स्थिती आहे. या राज्यात भाजपप्रणित एनडीए आघाडीसाठी फाइट टफ राहणार आहे. या चारही राज्यात विरोधक मजबूत स्थितीत आहेत. विशेष म्हणजे ही चार राज्ये अशी आहेत की जिथे लोकसभेच्या 126 जागा आहेत. या राज्यात जर भाजपला फटका बसला तर त्यांचं गणित नक्कीच डळमळू शकतं.