Download App

संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरे अध्यादेश रद्द करा, ओबीसींपाठोपाठ वंचितचीही मागणी

आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. - वंचित

  • Written By: Last Updated:

VBA on Sage Soyare Ordinance: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधकांनी बहिष्कार टाकला. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. त्यामुळं सरकार सगेसोयरेचा अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा (Sagesoyare) अध्यादेश रद्द करा, अशी मागणी केली.

अग्निविरांसाठी आनंदाची बातमी! CISF-BSF मध्ये मिळणार आरक्षण, जाणून घ्या सर्वकाही 

 

मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेश काढावा, अशी मागणी लावून धरली. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते जोरदार विरोध करत आहेत. ओबीसी नेत्यांपाठोपाठ आता वंचितनेही अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली. वंचितने आपल्या अधिकृत X हँडलवर पोस्ट करत लिहिलं, आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळंच संवैधानिक चौकटीने दिलेल्या मार्गदर्शक नियमांना छेद देऊन अध्यादेश काढता येत नाही, असं वंचितने म्हटलं.

गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात हा माणूस…; बीडमधून जरांगेंचा हल्लाबोल 

याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, जात प्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातात. त्यात सोयरे ग्राह्य धरले जात नाहीत. सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंवैधानिक/बेकायदेशीर आहे. सगेसोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही, तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे. या मागणीने आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धोका निर्माण होतो. वंचित बहुजन आघाडी समग्र आरक्षणाच्या बचावासाठी उभी आहे. त्यामुळेच ‘सगेसोयरेचा’ अध्यादेश रद्द करावा असा ठराव वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील आंदोलनस्थळी जाऊन वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली होती. त्यामुळे आंबेडकरांचा जरांगेच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचं चित्र होतं. मात्र, वंचितने सगेसोयरे अध्यादेशाला विरोध केल्यानं जरांगेंना मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं आहे.

follow us