Mumbai Vasai Virar Crime : प्रेम आंधळं असतं अन् त्यातही ब्रेकअप झालेला असेल तर भयानकचं. संशयाचं भूत डोक्यात शिरल्यानंतर किती अर्थाचा अनर्थ होतो आणि एखाद्याच्या जीवावर बेततो याचं आणखी एक चीड आणणारं उदाहरण अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. आजची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत विदारक ठरली. सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर निघालेल्या आरती यादवचा तिच्या पूर्व प्रियकराने अत्यंत निर्घुण पद्धतीने खून केला. आरतीला भर रस्त्यातच गाठलं अन् हातातील लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. काही कळण्याच्या आत आरती जमिनीवर पडली अन् तिने प्राण सोडला. यानंतरही मारेकरी मृतदेहाजवळ उभा राहून ऐसा क्यूं किया असे म्हणत होता. नंतर वाळीव पोलिसांनी त्याला अटक केली.
आज सकाळी वसई पूर्वेच्या गावराई पाडा या भागात ही घटना घडली. रोहित यादव (वय 28) असं या युवकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रोहित यादव हा मूळचा हरियाणातील रहिवासी आहे. तर आरती यादव ही उत्तर प्रदेशातील होती. या दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र एक महिन्यापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. ही गोष्ट प्रियकर पचवू शकत नव्हता. याच रागाच्या भरात त्याने पूर्व प्रेयसीचा काटा काढण्याचे ठरवले होते.
आज सकाळीच त्याने कामावर निघालेल्या पूर्व प्रेयसीली रस्त्यातच गाठले. लोखंडी पान्ह्याने तिच्यावर तब्बल 15 वार केले. ही घटना घडत असताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तिला वाचविण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. मदत तर केली नाहीच उलट व्हिडिओ बनवण्यात मश्गूल राहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकालाच तीव्र संताप आला. हा माणूस आहे की हैवान अशा संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या.
Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
एकाने मदत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मारेकऱ्याने त्याच्यावरही पान्हा उगारला. त्यामुळे भीतीने तो तसाच मागे सरला. यानंतर मारेकऱ्याने प्रेयसीवर प्राणघातक वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. पुढे प्रियकराने तिथेच उभा राहून क्यों किया असे म्हणत होता. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या मारेकऱ्याला अटक केली.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी खाली वाकून मुलीला तू असं का केलं असं विचारताना दिसतो. यावेळीही त्या मुलीला वाचविण्यासाठी कुणीही धजावत नाही. आरोपी मृत तरुणीला का केलंस असं विचारतो आणि पुन्हा तिच्यावर वार करतो. यावेळीही त्याच्या आजूबाजूला मोठी गर्दी असते. पण तरीही या गर्दीतून एकाचीही त्या आरोपीला रोखण्याची हिंमत होत नाही. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? गर्दीतून दोन चार जण जरी पुढे आले असते तर कदाचित या मुलीचा जीव वाचू शकला असता पण, दुर्दैवानं तसं घडलं नाही. या घटनेमुळं वसईसह संपूर्ण मुंबई सुन्न झाली आहे. लोकांच्या या निष्क्रियतेमुळे माणुसकी मेली का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Mumbai मध्ये वादळी पावसाचा कहर; बॅनर कोसळल्याने मेट्रो ठप्प, प्रवाशांचे मोठे हाल