वर्सोवा पुलाजवळ भूस्खलन; पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली अडकला, बचावकार्य सुरू

वर्सोवा पुलाजवळ भूस्खलन; पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली अडकला, बचावकार्य सुरू

Landslides In Vasai : पालघर जिल्ह्यातील वसई येथील ससून नवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचं खोदकाम सुरू असताना काल रात्री खोदकाम करणाऱ्या यंत्रावर मातीचे ढिगारे पडल्याची घटना समोर आली आहे. (Landslides) एक ऑपरेटर मातीच्या ढिकाऱ्याखाली अडकल आहे. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती ‘NDRF’कडून देण्यात आली आहे.

दुर्दैवी घटना! पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; दुर्घटनेत 670 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती

वर्सोवा खाडी पुलाजवळ खाडीच्या खालील बाजूने सुर्या योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. एल अँड टी या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे. या जलवाहिन्या टाकण्यासाठी खाडीच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलं असून ते अजूनही सुरू आहे. दरम्यान, काल पोकलेनच्या साहाय्याने काम सुरू असताना अचानकपणे जमिनीचा काही भाग खचला. यात पोकलेनसह चालक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे.

China Landslide : चीनमध्ये भीषण दुर्घटना भूस्खलनामुळे 47 हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकले

मोठ्या प्रमाणात माती-दगड ढासळ्याने हा भाग खचला आहे. काल रात्रीपासूनच या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएची टीम काम करत आहे. आता एनडीआरएफची अधिकची तुकडी बोलवण्यात आली असून त्यांच्याकडून हे पुढील काम सुरू आहे. तसंच, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला काढण्याचं काम सुरू केलं होत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज