Download App

अहमदनगरमध्ये महा रक्तदान शिबिराचं आयोजन, देशपातळीवर घेतली गेली दखल…

Ahmednagar शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महा रक्तदान शिबिर 2024 चे आयोजन केले गेले होते.

Blood Donation Camp in Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महा रक्तदान शिबिर (Blood Donation ) 2024 चे आयोजन केले गेले होते. अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून कै. भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेतले जात आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले.

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी घडामोड; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार

यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हास्तरावर महा रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पडत असतात. विचार हा सकारात्मक असला पाहिजे. त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचला जातो. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात. यावेळी रक्ताची आवश्यकता पडते.

शिंदे, फडणवीस अन् दादांसाठी धोक्याची घंटा… ‘मविआ’ विधानसभेलाही देणार दणका?

या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल. नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे. कै. भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. आता या शिबिराला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्याभरातील सुमारे ५ हजार मोबाईल व्यावसायिक व ग्राहक रक्तदान करत असतात. समाजामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासत असते. त्यांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी असोसिएशन एक दिवस आपले दुकान बंद ठेवून रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत असतात. या रक्ताचा उपयोग डायलेसिस, थैलासीमिया व शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना होईल. संग्राम भैय्या सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जय हरी विठ्ठल ! कडक मराठीवर आषाढी वारी विशेष भाग बघा

तर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा रक्तदान शिबिराचा उपक्रम सकारात्मक आहे, जिल्हाभरातील मोबाईल व्यावसायिक एकत्र येऊन समाजासाठी आरोग्यदायी उपक्रम राबवत युवकांमध्ये ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. 

शंकराचार्यांनी सांगितलयं, ‘विश्वासघात’ हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप; ठाकरेंचा शिंदे गटावर रोख

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अजित पवार यांनी आभार प्रदर्शन केले.  पाच हजार रक्तपिशव्याचे संकलनअहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये आमदार  संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रक्तदान करत सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन दिले. रक्तदान करण्यासाठी शहरातील सर्व रक्तपिढ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.  यामध्ये मोबाईल व्यावसायिक, ग्राहक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सुमारे ५ हजार रक्त पिशव्यांचे संकलन झाले, अशी माहिती अजित जगताप यांनी दिली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिक विधाते, संजय चोपडा, विकी जगताप, गिरीश अग्रवाल, कमलेश भिंगारवाला, यश मेहता, रितेश सोनीमंडलेचा, सतीश लोढा, सुदाम वाडेकर, श्रीपाल ओहस, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, दगडू पवार, संभाजी पवार, अमित बुरा, गोरख पडोळे, अतुल रचा, मनीष चोपडा, संजय जाधव, संतोष बलदोटा, रितेश सोनीमंडलेचा, साजिद खान, हिराशेठ खूबचंदानी, प्रितम तोडकर, राहूल सोनीमंडलेचा आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us