श्री सदगुरू शंकर महाराज समाधीमठात सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबीर संपन्न

Letsupp Image   2025 06 04T121434.122

Blood Donation Camp At Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi Math : श्री सदगुरू शंकर महाराज समाधीमठात (Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi) सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp) करण्यात आलं होतं. मंगळवार दि. 03 जून 2025 रोजी 50 व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार उल्हास पवार आणि उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाला. यावेळी 321 भाविकांनी रक्तदान केले.

दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस सातत्याने 50 महिने रक्तदान शिबीर आयोजीत करणारी शंकर महाराज समाधी ट्रस्ट (Pune News) ही एकमेव संस्था आहे. यापुर्वीच महाराष्ट्र शासनाने संस्थेस गौरव चिन्ह देऊन सन्मानीत केलं आहे.

मोफत खिचडी प्रसादाचे वाटप

ट्रस्टतर्फे दररोज 5 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसादाचे वाटप होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि धर्मवीर संभाजी शाळा नवी पेठ या तीन ठिकाणी दररोज मोफत भोजन प्रसादाचे वाटप होते, अशी माहिती विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांनी दिली.

‘जेलमध्ये आरोपींकडे 300 कोटी रूपये मागितले’, हगवणे प्रकरणातील सुपेकरांबाबत आमदार धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

याप्रसंगी उल्हास पवार म्हणाले आज मठ, मंदिर यासारख्या धार्मिक संस्थांनी आध्यात्मिक उपक्रमांबरोबरच समाजामध्ये सेवाभाव वाढवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याची अत्यंत गरज आहे, ज्याद्वारे तरूणांना श्री सद्गुरू शंकर महाराजांची भक्ती आणि नामस्मरण यासोबतच समाजाची सेवा करण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच सामाजिक कार्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त होईल.

श्री पुनीत बालन यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमास सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासीत केलंय. याप्रसंगी शिबीर सम्नवयक राम बांगड यांना सन्मानीत करण्यात आलंय.

Rain Update : 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट! उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

विश्वस्त मंडळ
डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव), सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube