Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meet : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक दावे प्रतिदावे होत आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येते गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आज सकाळी केला होता. त्यांच्या या दाव्याने आज राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा घडवून आणली. या घडामोडींवर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे उद्या आदिवासी समाज सत्तासंपन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections) पार्श्वभुमीवर आमदार बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. आपल्याकडून निवडणुकीबाबत काय तयारी सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले, आम्ही आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन एक आघाडी उभी करत आहोत. या आघाडीचं नामांतर आम्ही येत्या 6 ऑक्टोबरला जाहीर करू. भाजप सोडून ज्यांना कुणाला आघाडीत यायचं असेल ते येऊ शकतात. पण आम्ही मात्र कुणाकडेच जाणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.
video : राऊत अन् नड्डांची दिल्लीत तर फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, काय आहे प्रकरण?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (Devendra Fadnavis) मातोश्री येते गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आज सकाळी केला होता. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांच्याकडील माहिती त्यांनी पब्लिक केली. मागील निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवाद्यांना फसवण्यात आले आहे. आता पुन्हा फसवण्यात येऊ नये असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी चार पाच दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत एकाही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही. ओबीसी आता एकांगी पडला आहे अशी परिस्थिती आहे. एकांगी पडला असताना त्यावर दबाव टाकला जातो आहे. बदनाम केले जात आहे. ओबीसी नेते जे पुढे आले त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
रविवारी निर्णय जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं