Download App

संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक; सोलापुरात घडली घटना

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडलीयं. सोलापुरच्या बाळे इथं राऊत एका कार्यक्रमात आले होते. संजय राऊत यांच्या हस्ते एका हॉटेलचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमानंतर संजय राऊत परतीच्या प्रवासावर असतानाच अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकलीयं. त्यानंतर अज्ञातांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून या अज्ञातांचा शोध सुरु आहे.

चर्चेतील नाव गायब, भाजपकडून धक्कातंत्राचा वापर : ‘विष्णू देव साय’ होणार छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

संजय राऊत आज सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापुरातील पुणे-राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी ते आले होता. संजय राऊत यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर संजय राऊत सोलापुर शहराकडे जात होते. त्याचवेळी काही अज्ञात कार्यकर्त्यांनी पुलावरुन एक पिशवी गाडीवर फेकली. या पिशवीमध्ये चप्पल असल्याचं समोर आलं.

पत्र लिहून कुणाला वेड्यात काढताय, आम्ही काय डोक्याला गोडं तेल लावतो? अंधारेंनी घेतला फडणवीसांचा समाचार

संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक केल्यानंतर अज्ञातांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अज्ञातांकडून राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. चप्पलफेक आणि घोषणाबाजी केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी तत्काळ धूम ठोकली. कार्यकर्ते पसार झाल्याने त्यांच्याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

BJP : ‘नैतिकतेचं ढोंग रचू नका, आधी ‘मविआ’चं ऑडिट करा’; भाजपाचं ठाकरेंना रोखठोक उत्तर

या घटनेनंतर सोलापूर पोलिसांकडून या कार्यकर्त्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतयं. विरोधी गटाकडून संजय राऊत यांची टिकेची तोफ डागलेली असतेच, त्यावर सत्ताधाऱ्यांकडून राणे कुटुंबियांकडून प्रत्युत्तर दिलं जात. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांवरुनच ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Ravanth Reddy : मुख्यमंत्री होताच रेवंथ रेड्डींनी दिला राजीनामा?

दरम्यान, या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या ठाकरे गटाच्या समर्थकांनी तत्काळ फेकलेली पिशवी बाजूला सारली. हॉटेलचे संचालक भवर कुटुंबियांकडून शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहनही करण्यात आलं. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. अखेर भवर कुटुंबियांनी दखल घेतल्याने कार्यकर्त्यांकडून होणारा राडा आणि गोंधळ टळल्याचं पाहायला मिळालं.

Tags

follow us