Download App

शहाजीबापूंनी तीस वर्षांचा बॅकलॉग कसा भरुन काढला? खास शैलीत दिलं उत्तर

Shahajibapu Patil : माझं एकही पत्र अद्यापर्यंत फेल गेलेलं नाही, दुष्काळ संपवण्यासाठी सर्वच मंत्र्यांनी माझ्या पत्राला मंजुरी देत भरघोस निधी दिल्याचं काय झाडी काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापूंनी आत्तापर्यंत पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचा उलगडाच केला आहे.

Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी कारवाई! विरोधी पक्षातील 45 खासदार निलंबित…

शहाजीबापू पाटील म्हणाले, माझं अजूनही एकही पत्र फेल गेलेलं नाही. पाण्यासाठी आत्तापर्यंत सर्वच मंत्र्यांनी माझ्या पत्राला मंजुरी देऊन निधी दिला आहे. जे मी स्वप्न पाहिल होतं की, दुष्काळ संपवायचा आहे. या तीन वर्षांत मी 1993 साली पाणी प्रश्नावर मोर्चा काढला होता. मोर्चादरम्यान अनेकांनी माझ्यावर टीका केली होती. हे पोरगं लबाड, पोपटावाणी आहे, असं काही पाणी मिळत नसतं, त्याच्यावर विश्वास ठेऊ नका, अशी टीका माझ्यावर करण्यात आल्याचं शहाजीबापूंनी सांगितलं आहे.

Advance Booking: किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासच्या ‘सालार’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘काटे की टक्कर’

1993 साली मी एका टेबलावर उभं राहुन भाषण केलं. जनतेला सांगितलं हे असं पाणी येतं. त्यातल फक्त एकच काम शिल्लक राहिलं असून उज्जनी धरणाचं उपसा सिंचन योजना. त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. मनोहर जोशींसह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या काळात मला सोलापूरसाठी पाणी मिळालं, त्यांनी मला बोलावून घेत योजनेतून तुम्हाला पाणी मिळतयं का बघा असं म्हणत असल्याचं शहाजीबापूंनी स्पष्ट केलं आहे.

Animal Box Office: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 17व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई

सोलापूरसाठी आत्तापर्यंत मला 12 ते 13 टीएमसीपर्यंत पाणी दिलं असून गुलाबराव पाटलांनीही मला 800 कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना दिली आहे. अद्यापही मला 200 कोटींची योजना लागणार आहे, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.

‘महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही बिळात…’; रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं

मी ज्या टप्प्यावर काम करीत गेलो. त्यामुळे आज माझे कुटुंबातील सर्वजण चांगलं काम करीत आहेत. माझी अर्थव्यवस्था ही विरोधकांसाठी टीका आहे, त्यांना असं वाटतयं. 50 खोक्यांवरुन अनेक टीका केली जाते पण पक्षाकडून निधी मागावावा लागतो, त्यावरच निवडणूका लढवाव्या लागतात, असंही शहाजीबापूंनी मिश्किलपणे सांगितलं आहे.

Tags

follow us