Download App

तुळजाभवानी मंदिर ते चित्रपटगृहाबाबत मंत्री आशिष शेलारांकडून आढावा घेत सूचना

Aashish Shelar यांच्या दालनात तुळजाभवानी मंदिर जिर्णोद्धार, चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे या विषयात बैठका झाल्या.

  • Written By: Last Updated:

Aashish Shelar reviews on Tuljabhawani Temple and Cinema Hall : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात आज तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा विकास, आणि मराठी चित्रपटांसाठी एक पडदा चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे या तिन्ही विषयात बैठका झाल्या. या तिन्ही विषयांत पुढील पंधरा दिवसांत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झाला.

प्रदेशाध्यक्षांनी जेवायला बोलावलं अन्… ‘त्या’ गुप्त भेटीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. सोमवारी हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सी मंदिर दुरुस्ती आणि डागडुजीचे काम करीत आहेत. या दोन एजन्सींमध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम घेण्याबाबत मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विभागाला निर्देश दिले.

निवडणुक आयोगाला मिळणार नवे आयुक्त; या अधिकाऱ्याचं नाव चर्चेत

मंदिराचा कळज ज्या खांबावर उभा आहे त्या खंबाना तडे गेले आहेत. त्यामुळे मंदिरांच्या मुख्य गर्भगृहाचे काम करावे लागले तर आई भवानी मातेची मुर्ती व तीच्या दैनदिन पुजा याबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, मंदिराचे पुजारी, स्थानिक, मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी बैठक घेऊन शासनाला उपाय सूचवा असेही आशिष शेलार यांनी सांगितले. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

‘गंगाधर ही शक्तिमान है’! धसांनी विश्वास गमावला, मुंडे भेटीवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

रायगड विकास प्राधिकरणातर्फे ६०० कोटीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामार्फत रायगड किल्ला आणि रायगड परिसराचा विकास करण्यात येणार असून या कृती आराखड्या संबंधित सादरीकरण तयार करण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करुन लवकरच रायगड प्राधिकरण, स्थानिक कलेक्टर, केंद्रिय पुरातत्व विभागाचे अधिकारी, राज्यशासनाचा पुरातत्व विभाग अशी संयुक्त बैठक घेण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

गुळाच्या सुरीनं नरडं कापलं, राजकीय सेटलमेंट…विश्वासघात; मुंडे-धसांच्या भेटीवर जरांगे पाटील संतापले

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे वेळोवेळी मांडलेल्या समस्यांपैकी एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्येविषयी आज मंत्रालयातील दालनात चर्चात्मक बैठक घेण्यात आली. राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत.

पुणे विद्यापीठात शिकल्यावर कुठंही राजकारण करता येतं, जेएनयूच्या कुलगुरूचं मोठं विधान

त्यामुळे उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवावी आणि बंद असलेली चित्रपटगृहे पुन्हा चालू करून त्यांनी फक्त मराठी सिनेमा दाखवावा आणि या चित्रपटगृहांना सवलती देणाबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावा असे संबंधित विभागाला मंत्री ॲड. आशिष शेलार आदेश दिले. येत्या पंधरा दिवसांत ही योजनेचा मसूदा सादर करून योजने संदर्भातील तज्ञ, थिएटर मालक, संबंधित अधिकारी या सर्वांसोबत बैठक घेऊन ही योजना जाहीर करू असे देखील मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

follow us