‘गळा मत चोरीचा, पुळका व्होट जिहादचा’; आशिष शेलारांकडून मविआ नेत्यांचा पर्दाफाश…
'गळा मत चोरीचा, पुळका व्होट जिहादचा', या शब्दांत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश केलायं.
Aashish Shelar : गळा मत चोरीचा अन् पुळका व्होट जिहादचा म्हणत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश केलायं. मतदार यादीतील दुबार मतदारांच्या नावांवरुन महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर आज आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारीच सांगितलीयं.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाखांपेक्षा कमी मतदान झालं. मात्र आम्ही मतदार याद्या पाहिल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतचोरी केली असं विचारु का? हा तुमचा घोटाळा आहे. मतदारसंघ , मतदारांची नावे राज ठाकरे यांनी हिंदू नाव काढलं. रोहित पवार यांच्या जामखेड मतदारसंघात, नाना पटोले यांच्या मतदारसंघात देखील दुबार मते आहेत, महाविकास आघाडी राजीनामा मागणार काय? असा थेट सवाल शेलार यांनी केलायं. तसेच यावेळी बोलताना शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारीच सांगितलीयं.
रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात 1243 मतांनी ते जिंकले आहेत. त्यांच्या मतदारसंघात 5532 नावे दुबार आहेत. तर दुसरीकडे नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नाना 208 मतांनी जिंकले त्यांच्या मतदारसंघात 477 दुबार मते ही मुस्लिम मते आहेत. तर तिसरे वरुण सरदेसाई यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात 13, 313 दुबार मतदार हे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत. ते 11 हजार 365 मतांनी जिंकले आहेत. संदीप क्षीरसागर बीडमधू 5324 मतांनी जिंकले असून 14 हजार 944 दुबार मते असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलंय.
◆- 149 : मुंब्रा विधानसभा: जितेंद्र आव्हाड
30,601 दुबार मुस्लिम मते
◆- 254 : माळशिरस विधानसभा : उत्तम जानकर
4399 दुबार मुस्लिम मते
◆- 100 : घनसावंगी विधानसभा : राजेश टोपे
11,751 दुबार मुस्लिम मते
केवळ 2309 मतांनी येथे शिवसेना निवडून आली.
◆- 235 : लातूर शहर : अमित देशमुख
20,613 दुबार मुस्लिम मते
◆- 178 : धारावी : ज्योती गायकवाड
10,689 दुबार मुस्लिम मते
◆- 186 : मुंबादेवी : अमीन पटेल
11,126 दुबार मुस्लिम मते
◆- 57 : उत्तर नागपूर : नितीन राऊत
8342 दुबार मुस्लिम मते
◆- 162 : मालाड पश्चिम : अस्लम शेख
17,007 दुबार मुस्लिम मते
ते जिंकले 6227 मतांनी.
◆- 96 : परभणी : राहुल पाटील
13,313 दुबार मुस्लिम मते
◆- 156 : विक्रोळी : सुनील राऊत
3450 दुबार मुस्लिम मते.
किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती.
◆- 175 : कलिना : संजय पोतनीस
6973 दुबार मुस्लिम मते
जिंकले 5008 मतांनी
◆- 158 : जोगेश्वरी पूर्व : अनंत नार
6441 दुबार मुस्लिम मते
जिंकले 1541 मतांनी
◆- 29 : बाळापूर : नितीन देशमुख
5251 दुबार मुस्लिम मते
◆- 159 : दिंडोशी : सुनील प्रभू
5347 दुबार मुस्लिम मते
6182 मतांनी जिंकले
◆- 242 : धाराशिव : कैलास पाटील
11,242 दुबार मुस्लिम मते
मोठी बातमी! एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय, या धडाकेबाज महिलेच्या हाती दिला तपास
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कसा खेळ केला, याची अनेक उदाहरण आहेत. याची यादीच तुम्हाला देतो. एकच फोटो वापरुन केवळ नावे बदलण्यात आली. मोठे घोटाळे महाविकास आघाडीने केले आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून खरा घोटाळा दाबला जात आहे. ‘चोर मचाये शोर’सारखा हा प्रकार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
