Download App

Thane Lok Sabha : ठाण्याचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच प्रताप सरनाईकांच्या पत्रानं फुटला पेपर

Thane Lok Sabha Election : कल्याणपाठोपाठ ठाण्यातूनही शिंदेसेनेला गुडन्यूज मिळाली आहे. या मतदारसंघावर दावा (Thane Lok Sabha Election) ठोकणाऱ्या भाजपाने दोन पावले मागे घेत हा मतदारसंघही शिंदे गटाला सोडण्याचं नक्की केलं आहे. जागावाटपात हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, प्रताप सरनाईक यांचं एक पत्र व्हायरल होत आहे. त्यावरून हा खुलासा झाला आहे.

Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव 

ठाण्याची जागा शिवसेनेला मिळण्याची चर्चा आहे. भाजपनं या जागेवरून दावा सोडल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिंदेंकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. सरनाईकांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. त्यासाठी त्यांनी कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांंचं एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यात सरनाईकांनी नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या क्षेत्रात असलेल्या गुन्ह्यांची माहिती या पत्राद्वारे सरनाईक यांनी मागितली आहे. निवडणूक लढवण्यासाठी गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक आहे. प्रताप सरनाईक यांनी हे पत्र 29 मार्च रोजी पोलीस आयुक्तांना लिहीले आहे.

मी आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या उमेदवारीकरता अर्ज दाखल करणार असून माझ्या विरुद्ध वसई विरार, मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रात गुन्हे दाखल आहेत का, याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. तरी आपण माझ्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांची देण्याची कृपा करावी, असे प्रताप सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का : लोकसभेचं तिकीट नाकारलेले आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला

ठाणे मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे ठाकरे गटात आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. महायुतीत निर्णय होत नव्हता. त्यामुळे तिकीट कुणाला द्यायचं हा प्रश्न कायम होता. भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकल्याने तिढा निर्माण झाला होता. परंतु आता मात्र हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित दिसत आहे.

follow us