India Becomes Worlds Fourth Largest Economy : भारतवासियांसाठी अभिमानाची बातमी आहे. जागतिक आर्थिक व्यवस्थेत (Indian Economy) भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. जपानला मागे (Japan) टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी ही माहिती दिली.
नीति आयोगाच्या (NITI Aayog) दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे अशी माहिती सुब्रमण्यम यांनी पीटीआयला दिली.
सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला दिला. यानुसार भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षात तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो असा विश्वास सु्ब्रमण्यम यांनी व्यक्त केला.
PF खात्यात जमा पैशांवर किती व्याज मिळणार? सरकारनं दिली मंजुरी; जाणून घ्या डिटेल..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच म्हणाले होते की अॅपल कंपनीचे आयफोन अमेरिकेतच तयार झाले पाहिजेत. यावर सु्ब्रमण्यम म्हणाले की मग टॅरिफचं काय होईल याबाबत काही सांगता येणं कठीण आहे. परंतु, सध्याच्या काळात वस्तू तयार करणे भारतात जास्त किफायतशीर आहे. सरकार पुन्हा एकदा त्यांच्याकडील संपत्ती भाडोत्री देईल किंवा विक्री तरी करील. यालाच असेट मोनेटायजेशन असेही म्हणतात. याचा पुढील टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होईल. यातून सरकारला आणखी पैसे मिळतील. यातून देशाचा विकास होईल.
फिच रेटिंग्सने सन 2028 पर्यंत भारताचा सरासरी वार्षिक वाढीची क्षमता 6.4 टक्के केली आहे. एजन्सीने याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये 6.2 टक्के आर्थिक वाढ राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. भारतीय अर्थव्यवस्थेने 2023 च्या अहवालाच्या वेळी आमचा जो अंदाज होता त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे असे फिच संस्थेने म्हटले आहे.
भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) एका अहवालानुसार यावर्षात भारतीय अर्थव्यवस्था चीनच नाही तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकील. या वर्षात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी 6.3 टक्के दराने वाढेल. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांत हा दर सर्वाधिक आहे. चीनची अर्थव्यवस्था 4.6 टक्के, अमेरिका 1.6 टक्के, जपान 0.7 टक्के तर युरोपाची अर्थव्यवस्था 1 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत 0.1 टक्का घसरण होण्याची शक्यता आहे असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
आता फक्त POK वरच चर्चा, हक्काचं पाणी देणार नाही; PM मोदींची तोफ पाकिस्तानवर धडाडली…