Download App

गुडन्यूज! EMI वाढणार नाही, रेपो रेट ‘जैसे थे’; आरबीआयचा मोठा निर्णय

No Change In Repo Rate EMI Not Decrease : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समिती (MPC) बैठकीचे निकाल जाहीर झाले आहे. यावेळी देखील रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना कर्जाच्या हप्त्यांमध्ये (Repo Rate) वाढ भोगावी लागणार नाही, तसेच सध्याच्या EMI रकमेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.

रेपो रेट ‘जैसे थे’!

सध्या रेपो रेट 5.50 टक्के इतका आहे. गेल्या सलग तीन बैठकीत आरबीआयने त्यात कपात केली होती. मात्र, यावेळी रेपो दर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

शरद पवारांना पुन्हा धक्का! ‘या’ माजी आमदाराच्या हाती घड्याळ; पदाधिकाऱ्यांचंही इनकमिंग

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट हा असा व्याजदर असतो, ज्यावर रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज देते. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँकांना कमी दरात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे त्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी करतात. परिणामी, गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्तेही कमी होतात. म्हणूनच रेपो रेटमध्ये होणारे बदल सर्वसामान्य ग्राहकांच्या EMI वर थेट परिणाम घडवतात.

एमपीसीच्या या बैठकीत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, भारताची आर्थिक प्रगती चांगली आहे. आगामी सणासुदीचा काळ आर्थिक हालचालींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, भारत-अमेरिका यांच्यातील करवाढीबाबत अजूनही काहीशा अनिश्चितता आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Jasprit Bumrah वर बीसीसीआय नाराज; गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा मोठा निर्णय

जागतिक आर्थिक परिस्थितीकडे लक्ष ठेवून आरबीआय अत्यंत सावधगिरीने पावले टाकत आहे. अमेरिका आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील घडामोडींचे परिणाम भारताच्या धोरणांवर होऊ शकतात, हे लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात स्थैर्य राखण्याचा निर्णय घेतला आहे.

सामान्य ग्राहकांसाठी काय अर्थ?

– EMI वाढणार नाही
– नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठीही थोडासा दिलासा
– बँकांकडून व्याजदरात मोठा बदल होण्याची शक्यता कमी
– घरखरेदी, गाडीखरेदी करणाऱ्यांना सध्या ‘स्टेबल पीरियड’

 

follow us