Sajana Movie Premiere: हॉटेल भाग्यश्री सुरू करणार खास कपल्स स्पेशल “सजना थाळी”!

Sajana Movie Premiere: हॉटेल भाग्यश्री सुरू करणार खास कपल्स स्पेशल “सजना थाळी”!

Sajana Movie Premiere : सजना हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर झळकणार आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या या चित्रपटाच्या खास प्रीमियर शोने एक वेगळीच रंगत आणली. सजना चित्रपटाच्या प्रीमियर (Sajana Movie Premiere) सोहळ्याला हॉटेल भाग्यश्री, हॉटेल ७७७७, हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरी या चार प्रमुख हॉटेल्सच्या मालकांनी पहिल्यांदाच एकत्र येत मैत्री आणि प्रेमाचा संदेश दिला. या अनोख्या उपक्रमामुळे प्रीमियरला खास रंगत आली. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके(Nagesh Madake) यांनी यावेळी एक मोठी घोषणा केली आहे.

हा क्षण केवळ चित्रपटापुरता मर्यादीत नव्हता. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत असलेल्या या हॉटेल्सचे मालक प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले. आपले भांडण, स्पर्धा विसरून त्यांनी सजना या चित्रपटाच्या प्रीमियरला (Sajana Movie Premiere) रंगत आणली. यावेळी धाराशीव येथील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके सपत्निक उपस्थित होते आणि त्यांनी तमाम प्रेमी युगुलांसाठी एक खास सरप्राईझ देखील दिले. त्यांनी लव्ह मॅरेजवाल्या कपल्ससाठी हॉटेल भाग्यश्रीमध्ये कपल्स स्पेशल “सजना थाळी” सुरू करणार असल्याची घोषणा केली.

सजना चित्रपटाबाबत थोडक्यात

चित्रकार शशिकांत धोत्रे यांचं दिग्दर्शन असलेला सजना हा चित्रपट २७ जूनपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहे. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विविध सिने-समिक्षकांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube