Kumar Ketkar : राज्यात सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी समोरासमोर उभी ठाकली आहे. तर भाजपविरोधी असलेल्या वंचित आघाडीची भूमिका काही वेगळीच असल्याचं दिसून येत आहे. वंचितला इंडिया आघाडीने अद्याप सामावून घेतलेलं नाही. याचं कारण काँग्रेसचे खासदार कुमार केतकर(Kumar Ketkar) यांनी स्पष्ट केलं आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून(Prakash Ambedkar) काँग्रेसला प्रस्तावच आला नसल्याचा दावा केतकर यांनी केला आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘पंचबीट फेम’ अभिनेता निखिल भांबरी सांगतोय त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल…
खासदार केतकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप काँग्रेसला प्रस्तावच आला नाही. त्यांच्या प्रवक्त्याने पत्र लिहिले आहे. आघाडी करायची असल्यास पक्षाच्या अध्यक्षांनी स्वतः प्रस्ताव देणे अपेक्षित आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा सोनिया गांधी यांना प्रस्ताव द्यायला हवा. ॲड. आंबेडकरांना काँग्रेसचा विरोध असल्याचा प्रश्नच नाही. ते दोन वेळा काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले असल्याचं केतकर म्हणाले आहेत.
Raj Thackeray : नातवाला डीजेचा त्रास झाला तर लगेच चर्चा मात्र.. अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
यावेळी बोलताना केतकर यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. 2024 मध्ये हाेऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळणार नाही. हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. कारण सध्याचे वातावरणच त्यांच्या विरोधात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधूनही त्यांना विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान ७० जागा कमी होतील, असा दावा केतकर यांनी केला.
‘आता तुम्ही गप्प बसा’; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर जरागेंचं रोखठोक भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली असून विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी सर्वच यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सध्याचा विचार केल्यास दक्षिणेसह देशातील विविध भागातील राज्यांमध्ये भाजपला स्थान नाही. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला कमाल यश मिळाले. आता त्या राज्यांमध्ये देखील भाजपला उतरती कळा लागणार असल्याचा दावाही त्यांन केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान 70 जागा कमी होणार असून मोदी सरकार बहुमतापासून दूर राहणार आहे, बहुमत नसताना मोदी कुठली भूमिका घेतात, हे सांगणे अवघड आहे. ते अटलबिहारी वाजपेयींसारखा राजीनामा देणार नाहीत, अशीही खोचक टीका केतकर यांनी केली आहे.
आमची बाजू शिवसेना ठाकरे गट मांडणार असून आमचे वकील उद्धव ठाकरे असल्याचंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी आमचं म्हणणं इंडियामध्ये मांडावं, आमच्या बाजून शिवसेना उद्धव ठाकरे गट बॅटिंग करणार असून वंचित महाविकास आघाडीमध्ये नसून इंडियाचं आम्हाला निमंत्रण नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.