Raj Thackeray : नातवाला डीजेचा त्रास झाला तर लगेच चर्चा मात्र.. अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

Raj Thackeray : नातवाला डीजेचा त्रास झाला तर लगेच चर्चा मात्र.. अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

Raj Thackeray : गणेशोत्सवाच्या काळात (Ganesh Festival) होणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोट ठेवत ट्विटर एक पोस्ट केली होती. उत्सवाच्या काळात डीजेचा दणदणाट आणि साउंड सिस्टीममुळे काय दुष्परिणाम होतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. अंधारे म्हणाल्या, एका मोठ्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली. त्याच्या डीजेचा नातवाला त्रास झाला म्हणून लगेच चर्चा. मात्र अनेक वर्ष लेझरमुळे अनेक जणांची दृष्टी जाते तेव्हा काय होतं. नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र सर्वसामान्यांची मुलही चांगली राहिली पाहिजे. दुपारी उठून कसं चालेल अशी खोचक टीका अंधारे यांनी केली.

आपल्या सणांवर बंदी आणायचा प्रयत्न झाला पण.. राज ठाकरे गरजले !

राज ठाकरेंची पोस्ट काय होती ?

डीजे, डॉल्बी ह्यांच्या आवाजाच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. मिरवणुकीत येऊन, नाचून आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग, चोवीस तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत मोठी नाही का?, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये केला होता.

आज एका बाजूला कौटुंबिक गणेशोत्सवात तो पर्यावरण पूरक असेल, थर्माकोलचा वापर टाळत, कृत्रिम तलावात विसर्जन करत, आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय आणि दुसरीकडे जेव्हा त्याचं सार्वजिक स्वरुप येतं तेव्हा त्यात वर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाही. ह्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आण अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बिभत्स स्वरुप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube