‘अब सब बिघड गये तुम्हारे उपर’; जरांगेंची सुरुवातच देवेंद्र फडणवीसांपासून

Manoj Jarnage On Devendra Fadnvis : “फडणवीसाहब अब सब बिघड गये तुम्हारे उपर…,तुम्हे सिर्फ बडे-बडे दिखते, सब के सब पीछे से आगे गये घ्या…लफडं गुंतवून आता, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांना लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, लोकसभा […]

लोकसभेत फक्त पाडा म्हटलो पण भुजबळांना जवळ केल्यास...; जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange

Manoj Jarnage On Devendra Fadnvis : “फडणवीसाहब अब सब बिघड गये तुम्हारे उपर…,तुम्हे सिर्फ बडे-बडे दिखते, सब के सब पीछे से आगे गये घ्या…लफडं गुंतवून आता, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांना लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखली जात आहे. अंतरवली सराटीत जरांगेंनी महाबैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीतून ते बोलत होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सलग दोनदा पराभव, तिसऱ्यांदा PM मोदींना देणार टक्कर; वाराणसीच्या मैदानातील अजय राय कोण?

मनोज जरांगे म्हणाले, राज्यभरात शांततेत मराठा समाजबांधवांकडून साखळी उपोषण, आमरण उपोषण, रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत होतं. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन राज्यातील मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याआधी फडणवीसांनी गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आंदोलनात वापरण्यात आलेल्या जेसीबी, क्रेनच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तुम्ही जितके गुन्हे दाखल केलेत तितक्याचं ताकदीने मराठा उसळून निघालायं. तुम्ही सत्तेचा गैरवापर केला अन् मराठ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मागच्या काळात झालेल्या आंदोलनाचे गुन्हे तुम्ही आत्ता का दाखल करीत आहात? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

तसेच मराठ्यांवर तुम्ही दहशत आणि दडपण्याचा प्रयत्न करत आहात. मराठ्यांना दपडण्याची ताकद कोणाचीच नाही. मराठा समाजबांधवांवर गुन्हे दाखल केले आहेत, हे पाप कुठं फेडणार तुम्ही फडणवीस. समाजाची नाराजी अंगावर ओढवून घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीच गरज नव्हती. सर्व पक्षातले मराठे स्वतच्या लेकरांसाठी एकत्र आले आहेत. मग ते विरोधी असो वा सत्ताधारी. गरज नसताना गुन्हे दाखल केले असल्याची टीकाही मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

आजच्या सभेसाठी महिलांना अडवलं गेलं…
यवतमाळच्या मराठा महिलांना सभेसाठी येण्यासाठी यवतमाळच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकंडून अडवण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या आईबहीणीविषयी असं वागणार का? अंतरवलीच्या बैठकीला जाऊ नका असं सांगण्यात आलं आहे महिलांना. ही देवेंद्र फडणवीस यांची दुसरी किमया आहे. आता मराठा समाजबांधव तुम्हाला घरी बसवणार असल्याचंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

Exit mobile version