Download App

पुण्यात पावसाचा हाह:कार; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला ग्राउंड रिपोर्ट

Pune Collector यांनी पत्रकार परिषद घेत पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने झालेल्या परिस्थितीचा आढावा मांडला. नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले.

Pune Collector Press Conference on Pune Rain : : पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान (Pune Heavy Rains) घातले आहे. पावसाने शहराची दैना उडाली आहे. ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune Collector) सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी परिस्थितीचा घेतलाला आढावा मांडला. तसेच नागरिकांना खबरदारी पाळण्याचे आवाहन केले आहे.

मोठी बातमी! राष्ट्रपती दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नामकरण, जाणून घ्या नवीन नावे

यामध्ये जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, आज दुपारी 12 पर्यंत पश्चिम मंडलमध्ये 65mm पाऊस झाला. त्यामध्ये मुळशी धरण क्षेत्रात सर्वात जास्त 484 mm पावसाची नोंद झाली. तर पाऊस वाढल्याने खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुरात आडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पुणे महापालिका फायर टीम, अग्नीशामक दल यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

Nagesh Darak Death: सुप्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही सकाळपासून संपर्क होते.त्यांनी आर्मी आणि नेव्हीशी संपर्क साधला. त्यामुळे एकता नगर परिसरात एक कॉलम येत आहे. 60-70 जणांची टीम आहे. शिवाजीनगर संगम परिसरात काही परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी आर्मीचा एक कॉलम स्टॅन्ड बाय मोडवर आहे. 4 वाजता खडकवासलातुन 35हजार क्यूसेसने पाणी सोडल जाणार आहे. आत्ता 15 हजार क्यूसेसने पाणी सुरु आहे. खासगी क्षेत्राला सुट्टी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. मात्र सरकारी आस्थापन सुरु राहतील.

Aparshakti Khurana: अभिनेत्याने परेश रावलसह ‘हेरा फेरी’ सीन केला रेक्रिएट, व्हिडीओ व्हायरल

दुसरीकडे लवासा सिटीमध्ये 1 ठिकाणी दरड कोसळली आहे. 3 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील धोकादायक असणारे पर्यटन स्थळ पुढील आदेश येऊपर्यंत बंद आहेत. तर जिल्ह्यातील सगळे धोकादायक पूल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती पाहता पुढच्या 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अत्यंत महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. वाहत्या पाण्यामध्ये वाहने घालू नका.

पुणे शहरात महापालिकेने 400 लोकांना स्थलांतरित केले आहे. जिल्ह्यातील एकही गावाचा संपर्क तुटलेला नाही. सकाळी जी परिस्थिती उद्भवली ती आज पुन्हा होण्याची शक्यता आहे. इंद्रायणीची पातळी वाढणार आहे. आम्ही pcmc ला चेतवाणी दिलेली आहे. राज्य मार्ग 2 जिल्हा मार्ग 5 एकूण 7 मार्ग बंद झाले आहेत. वाराजे येथे म्हशीच्या गोठ्यात पाणी शिरल्याने 15 जनावरांचा मृत्यू झाला आहे. असा सर्व ग्राउंड रिपोर्ट या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

follow us