Download App

Pune Rain : पुण्यात पावसाला सुरुवात; आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.

Pune Rain : राज्यात मान्सून दाखल होताच हवामान पूर्ण बदललं आहे. हवामान विभागाने (Pune Rain) दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात कालपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी (Monsoon Update) लावली आहे. सकाळीच ढगांच्या गर्दीने अंधारल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. फक्त नंदूरबार जिल्ह्यात हवामान कोरडे राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईसह विदर्भात धडक देईल. आगामी पाच दिवसात जिल्हा पातळीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे.

आनंदवार्ता! महाराष्ट्रात वरुणराजाचं आगमन; आज ‘या’ भागात पावसाचा इशारा

आज कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांत आज पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या व्यतिरिक्त अन्य काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दिसून येत आहे.

मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र नागरिकांना चांगली बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचं आज आगमन झालं. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे.

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाले आहे. यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस पडला होता.

साधारणपणे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या राज्यांत मान्सूनचा एन्ट्री 5 जूनपासून होते. परंतु, मान्सूनची सध्याची गती पाहता एक ते दोन दिवस आधीच या भागात मान्सून दाखल झाला. आयएमडीने असा अंदाज व्यक्त होता की दक्षिण अरब समुद्र, लक्षद्वीप आणि बंगालच्या खाडीतील विविध ठिकाणी मान्सून पुढे सरकणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Monsoon 2023 Update: आला रे आला, अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल!

 

 

follow us

वेब स्टोरीज