Champions Trophy Ex Cricketer Warn India : टी 20 विश्वचषक ( T20 World Cup) स्पर्धेनंतर पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने (Champions Trophy 2025) होणार आहेत. पाकिस्तानने मात्र आतापासूनच या स्पर्धांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार का याबाबत अद्याप काहीच ठरलेलं नाही. त्यावर आता एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने ( Ex Cricketer ) भारताला इशारा दिला आहे.
माजी क्रिकेटपटूचा भारताला इशारा…
पाकिस्तानचा माजी विकेट किपर बॅट्समन रशीद लतीफ याने भारताला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी साठी न येण्याचे परिणाम भोगावे लागतील. असे म्हटले. भारताच्या या कृतीचा उलटा परिणाम होऊ शकतो. तुम्ही द्विपक्षीय मालिका नाकारू शकता पण आयसीसी स्पर्धा नाकारणे कठीण आहे. तसेच तुम्ही संघ संमतीनंतर आयसीसी स्पर्धेसाठी स्वाक्षरी करता. मग तुम्ही पाकिस्तानमध्ये येण्यास नकार कसा देऊ शकता? असा सवाल लतीफने केला आहे.
Irfan Khan ची पत्नी सुतापाचं हृदयस्पर्शी पत्र; म्हणाली चमकीला पाहून त्याने दिलजितसोबत…
दरम्यान इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने या स्पर्धांसाठी जो ड्राफ्ट तयार केला त्यानुसार भारतीय संघाचे सर्व सामने लाहोर शहरात (Lahore) खेळवण्याची योजना आखली जात आहे. अंतिम सामनाही याच शहरात आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने लाहोर शहर सोयीचे ठरेल अस विचार यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Samruddhi Highway वर अपघातांचं सत्र सुरूच; भीषण अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी
भारतीय संघाची सुरक्षितता आणि प्रवासा दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लाहोरचा विचार केला जात आहे. याचे दुसरे एक कारण म्हणजे लाहोर वाघा बॉर्डरच्या जवळ आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रवासाचा सोपा पर्याय राहिल. या शहराचा सध्या फक्त विचार सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. कारण या सर्व गोष्टी भारतीय संघाच्या प्रतिसादावर अवलंबून राहणार आहेत.