Irfan Khan ची पत्नी सुतापाचं हृदयस्पर्शी पत्र; म्हणाली चमकीला पाहून त्याने दिलजितसोबत…

Irfan Khan ची पत्नी सुतापाचं हृदयस्पर्शी पत्र; म्हणाली चमकीला पाहून त्याने दिलजितसोबत…

Irfan Khan Wife Emotional Letter : अभिनेता इरफान खान ( Irfan Khan ) हा त्याच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखला गेला. प्रेक्षकांच्या मनावर त्याने त्याचा वेगळा असा ठसा उमटवला. म्हणूनच आजही त्याच्या आठवणी कायम आहेत. त्यात आता इरफान खानच्या आठवणीत त्याची पत्नी सुतापा सिकदार ( Sutapa Sikdar )ह्यांनी इरफानला फार हृदयस्पर्शी पत्र लिहिलंय. त्यामुळे त्याच्या चाहते पुन्हा एकदा त्याच्या आठवणींमध्ये रमले आहेत.

काय आहे सुतापा सिकदार यांचं पत्र?

इरफान मला सोडून गेला. त्याला आज चार वर्षं आणि तीन दिवस झालेत. चार वर्षं? विचार करूनच माझ्या शरीरभर अपराधी भावना वाहू लागते. आम्ही गेली चार वर्षं “आयुष्य कंठलंय” इरफानला आमच्यातून वजा करून आणि आयुष्यात बेरीज केलीय दुःख, भीती, नैराश्य व हतबलतेची. नंतर मला जाणवलं की, मी त्याच्यासोबत जगलेला काळ हा जास्त मोठा आहे.

Samruddhi Highway वर अपघातांचं सत्र सुरूच; भीषण अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी

त्याला १९८४पासून ओळखते मी, म्हणजे मी त्याच्यासोबत ३६ वर्षे राहिले आहे. बहुतेक, मी जेव्हा मरीन तोपर्यंतसुद्धा माझा त्याच्यासोबत जगलेला काळ हा त्याच्याशिवाय जगलेल्या काळापेक्षा जास्तच असणार आहे. मग मी विचार केला, जर तो २०२४मध्ये माझ्यासोबत खरोखरच असता तर आमचा संवाद कसा झाला असता? कारण तीच गोष्ट मी सगळ्यात जास्त मिस करते.आज, २०२४ मध्ये, तो शूटवरून सरळ घरी आला असता, आधी आमच्या मांजराला गोंजारत बसला असता आणि मग पुस्तक घेऊन वाचनाला सुरुवात केली असती.

विखेंची कॉंग्रेसमध्ये येण्यास धडपड सुरू; आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ तर थोरातांनीही दिला दुजोरा

मी : तू चमकिला पाहायलाच पाहिजे.
(त्याने लगेच चमकिला शोधून बघितला नसता, कारण पुस्तकं वाचताना तो हे करायचा नाही.)
मी : तो खूप भारीये.. मला त्याचा परफॉर्मन्स आवडला..
तो : अच्छा? कोण ?
मी : अरे यार दिलजित दोसांझ.. तो स्ट्रक्चर्ड नाहीये, जीव तोडून काम करतो. त्याला स्क्रीनवर पाहून फील होतं मला.
तो : (आता माझ्याकडे पाहत) अच्छा.. यु थिंक ही इज दॅट गुड?
मी : येस!! तुम्ही दोघांनी सोबत काम करायला पाहिजे. जादू होईल. तू ‘किस्सा’नंतर पुन्हा एकदा सरदारचा रोल कर आणि दोन भावांची स्टोरी करू शकता..
तो : हम्म.. (फोन वाजतो) हेय दिनू (दिनेश विजन) यार यह सुतापा बोल रही है दिलजीत दोसांझ अच्छा है..
मी : अच्छा नहीं बहुत अच्छा..

नुसतं बाळासाहेब म्हणू नका, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरते का? ठाकरेंची PM मोदींवर हल्लाबोल

तो : हाँ यार लेट्स डू समथिंग.. लेट्स डू समथिंग ऑन पंजाबी सूफी पोएट्स.. मैं देखता हूँ आज चमकीला..
किंवा घरात प्रवेश करताना त्याच्या हेडफोनवर गाणी ऐकतच आला असता.. म्हणाला असता.. अरे यार सुतुप क्या लिखा है इरशाद ने.. (त्याला इर्शाद कामिल खूप आवडायचा) उफ़ खतरनाक.. सुना है तुमने विदा करो?.. व्हाटअसॉंग.. मग तो आणि त्याचा मॅनेजर मनप्रीत बसले असते आणि इरफान म्हणाला असता मला एखादी मल्याळम फिल्म मिळवून दे..

मला त्या दिग्दर्शकासोबत काम करायचय.. तो नाही का जो फहाद फासीलसोबत काम करतो.. यार आय अॅम फरगेटिंग द नेम. आय अॅम टेलिंग यु.. जर बॉलीवूडने लवकर आपला रस्ता बदलला नाही ना.. बरंच काही बोलला असता पुढे.. मी मल्याळम फिल्म करणार! असं म्हणत सुतापा यांनी इरफानला त्या खुप मिस करत असल्याचं सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube