Father’s Day 2023 : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बाप-लेकाच्या प्रसिद्ध जोड्या

Father’s Day 2023 : ‘फादर्स डे’ (Father’s Day) निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi movies) सुप्रसिद्ध बाप-लेकांच्या आकर्षक जोड्या…
‘फादर्स डे’ (Father’s Day) हा दिवस बापाचा आणि मुलांच्या नात्यासाठी खास असतो. यावर्षी 18 जून रोजी फादर्स-डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत, बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या…

Madhavan Vedanta
आर. माधवन (R. Madhavan) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने कायम जिंकत आला आहे. आर. माधवनचा मुलगा वेदांत (Vedanta) हा सिनेमासृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या कौशल्याने देशाचे आणि आपल्या वडिलांचे नाव परदेशात उंचावत आहे. वेदांत हा स्विमर आहे. (R Madhavan Vedanta) अनेकवेळा आर. माधवन हा वेदांचे फोटो शेअर करुन त्याच्या क्रिडा क्षेत्रातील कार्याची माहिती चाहत्यांना देत असतो.

Shah Rukh Khan Aryan Khan
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा म्हणजे किंग खानचा मुलगा आर्यन खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. (Shah Rukh Khan Aryan Khan) आर्यनची ‘स्टारडम’ ही वेब सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. किंग खान आणि आर्यन ही बॉलिवूडमधील बाप-लेकाची प्रसिद्ध जोडी आहे.

Laxmikant Berde acting as Berde
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा देखील अभिनेता आहे. (Laxmikant Berde Abhinay Berde) अभिनयनं मन कस्तुरी रे, रंपाट, ती सध्या काय करते या सिनेमामध्ये काम केलं आहे.

Mahesh Kothare Adinath Kothare
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे हे विविध प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. महेश कोठारे यांच्या झपाटलेला, धुमधडाका, पछाडलेला या सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. (Mahesh Kothare Adinath Kothare) महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा देखील मनोरंजन क्षेत्रात काम करतो.

Irfan Khan Babil Khan
दिवंगत अभिनेता इरफान खान हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत होतं. (Irfan Khan Babil Khan) इरफान यांच्या नॅचरल अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता इरफान यांचा मुलगा बाबिल खान हा देखील अभिनयक्षेत्रात काम करत आहे. बाबिलच्या नेटफ्लिक्सवरील कला या चित्रपटामधील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.