Irfan Khan Death Anniversary : बॉलिवूडसह हॉलिवूडवर छाप सोडणारा अभिनेता, ‘या’ भूमिका गाजल्या…

Irfan Khan Death Anniversary : बॉलिवूडसह हॉलिवूडवर छाप सोडणारा अभिनेता, ‘या’ भूमिका गाजल्या…

Irfan Khan Death Anniversary : डोळ्यांनीही अभिनय करणारा अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा दिवंगत अभिनेता इरफान खान हा बॉलिवूडमधील अशा स्टार्स पैकी एक होता. ज्याने चित्रपटाच बजेट आणि अभिनेत्रीपेक्षा चित्रपटाची कथा आणि त्यांच्या पात्राला जास्त महत्त्व दिलं. मात्र बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याला ब्रेन ट्युमरसारख्या आजाराला सामोरे जावं लागलं.

कॅन्सरशी दोन वर्षे झुंज देताना 29 एप्रिल 2020 साली इरफान खानने या जगाचा निरोप घेतला. आज त्याचा तिसरा स्मृतिदिन. मात्र इरफान खान जरी आज आपल्यात नसला तरी त्याने साकारलेल्या भूमिका आणि व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.पाहूयात इरफान खानने साकारलेले असे काही पात्र, ज्याच्या जोरावर इरफान बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड मध्ये एक वेगळीच छाप सोडली.

मकबूल
2003 मध्ये प्रदर्शित झालेला विशाल भारद्वाज दिग्दर्शित इरफान खानचा मकबूल हा चित्रपट शेक्सपियरच्या प्रसिद्ध नाटक मॅकबेथवर आधारित होता. हा चित्रपट इरफानच्या अभिनय कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात इरफान व्यतिरिक्त अभिनेते पंकज कपूर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, तब्बू आणि पियुष मिश्रा यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे.

रितेश बत्रा दिग्दर्शित ‘द लंच बॉक्स’ हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकावले. या चित्रपटातील इरफानची भूमिका चांगलीच गाजली होती. यात इरफानशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

पान सिंग तोमर
2012 साली प्रदर्शित झालेल्या तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित ‘पान सिंग तोमर’ या चित्रपटात इरफानने एका प्रसिद्ध डाकूची भूमिका साकारली होती. पान सिंग तोमर एका अॅथलीटमधून कसा डकैत बनला हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील इरफानच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला.

हासील
तिग्मांशु धुलियाच्या दिग्दर्शित 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हासील’मध्ये इरफानने नकारात्मक भूमिका साकारली होती. चित्रपटातील रणविजय सिंगच्या भूमिकेसाठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

द नेमसेक
इरफान खान ला आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खरी ओळख मिळाली ते 2006 साली प्रदर्शित झालेल्या द नेमसिक या चित्रपटातून. हा चित्रपट झोपा नगरीच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि इरफानसोबत तब्बूची मुख्य भूमिका होती.

लाईफ ऑफ पाय
2012 मध्ये इरफान लाइफ ऑफ हॉलिवूड चित्रपटात पायची मुख्य भूमिका साकारली होती. आणि इरफान ची ही भूमिका चाहत्यांना खूपच आवडली होती.

The Bridge : राज कुमारीचा नवा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदी मिडीयम
2017 साली प्रदर्शित झालेला ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट इरफानच्या करिअरमध्ये नेहमीच लक्षात राहील. या चित्रपटासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात इरफानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत होते.

तलवार
2015 साली प्रदर्शित झालेला इरफान खानचा ‘तलवार’ हा दुहेरी हत्याकांड असलेला क्राइम थ्रिलर चित्रपट होता. या सिनेमात इरफानने एका हत्येचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तर हा चित्रपट आरुषी हत्याकांडावर बनवण्यात आला होता.

पीकू
2015 साली प्रसिद्ध झालेली प्रदर्शित झालेल्या सुजित सरकार दिग्दर्शित पिकू या चित्रपटात इरफान राणा चौधरी ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्याशिवाय अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात राणा चौधरी हा पिकूच्या म्हणजे दीपिकाच्या प्रेमात आहे.

अंग्रेजी मिडीयम
2020 साली आलेला ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफान खानचा शेवटचा चित्रपट होता. हा त्याचा 2017 मधील सुपरहिट चित्रपट हिंदी मीडियमचा सिक्वेल होता. या चित्रपटात इरफानशिवाय करीना कपूर, राधिका मदन आणि दीपक डोबरियाल सारखे कलाकार होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube