IND vs AUS 4th Test : बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिकेतील (Border – Gavaskar Test Series) चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये शकते का? याबाबत आता सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधान आले आहे. मेलबर्न (Melbourne) येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडे पाचव्या दिवशी 340 धावांचा लक्ष्य होता मात्र भारतीय संघ 340 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तरात 155 धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने सामना 184 धावांनी जिंकला आणि या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
या मालिकेचा शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी (Sydney) येथे खेळवला जाणार आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचा भारताचा मार्ग कठीण झाला आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सिडनी कसोटी जिंकावी लागणार आहे. याच बरोबर पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आणि श्रीलंका (SL vs Aus) मालिकेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 ने जिंकावी अशी अपेक्षा करावी लागेल. जर बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिका भारतीय संघाने ड्रॉ केली नाहीतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर होणार.
#TeamIndia fought hard
Australia win the match
Scorecard ▶️ https://t.co/njfhCncRdL#AUSvIND pic.twitter.com/n0W1symPkM
— BCCI (@BCCI) December 30, 2024
बॉर्डर – गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 340 धावांचा लक्ष्य दिला मात्र भारतीय संघ 340 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 155 धावांवर गारद झाला. भारताकडून सर्वाधिक धावा यशस्वी जैस्वालने केल्या. त्याने 208 चेंडूमध्ये 84 धावा केल्या. तर ऋषभ पंत 30 धावा करून बाद झाला. या सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या सत्रात 24 धावांत 7 विकेट गमावल्या.
Sangram Jagtap : ताबेमारी प्रकरणावरून संग्राम जगताप आक्रमक…थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने 3-3 विकेट घेतले तर मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेडने 1-1 विकेट घेतली आणि नॅथन लायनने 2 विकेट घेतले.
Bank Holidays January 2025: जानेवारीत 15 दिवस बँका राहणार बंद, ‘हे’ आहे कारण