Download App

धर्मशाला कसोटीत टीम इंडियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल, रोहित-शुभमनची दमदार शतकं

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर भारत मजबूत स्थितीत आहे.भारताने 105 षटकांत 8 बाद 435 धावा केल्या आहेत. यासह त्याची आघाडी 209 धावांची आघाडी आहे. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) 103 धावा तर शुभमन गिल (Shubman Gill) 110 धावांसह शानदार शतक झळकवले.

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 218 धावांवर ऑलआऊट झाला आहे. पहिल्या दिवशी भारताची एकमेव विकेट यशस्वी जैस्वालच्या रूपात पडली होती. त्याने 57 धावांचे योगदान दिले होते. रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले, रोहितचे शतक 154 चेंडूत झाले. रोहितनंतर शुभमन गिलनेही 137 चेंडूत चौथे कसोटी शतक पूर्ण केले.

International Women’s Day 2024 निमित्त जागृत करू स्त्री शक्ती; तुम्हाला माहितीये महिलांचे हे विशेषाधिकार?

मात्र, लंचनंतर टीम इंडियाला सलग दोन धक्के बसले, पहिला बेन स्टोक्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. धावफलकात आणखी 4 धावांची भर पडल्यानंतर शुभमन गिललाही जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 103 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. सर्फराज खानने 56 धावांचे योगदान दिले.

Kuldeep Yadav : कुलदीपनं केली कमाल! ‘या’ खास रेकॉर्डमुळे ठरला टीम इंडियाचा पहिला गोलंदाज

दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 57.4 षटकात 218 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या, तर शंभरावी कसोटी खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विननेही चार विकेट घेतल्या, रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

महिला दिनी सुधा मूर्ती यांचा सन्मान : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती

follow us