Gadchiroli-Chimur Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत हॅट्ट्रिक साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण यंदा त्यांना अपेक्षित निकाल लागला नाही. गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले भाजप खासदार अशोक नेते यांना यंदा हॅट्ट्रिक करता आली नाही. या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. नामदेव दासाराम किरसान (Dr. Namdev Kirsan) विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.
चंद्रपूर कॉंग्रेसकडे, मुनगंटीवारांना दिल्ली दूरच! प्रतिभा धानोरकरांनी गड राखला
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक महादेवराव नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव दासाराम किरसान यांच्यासह दहा उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची आज मतमोजणी झाली. या मतमोजणीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे 1 लाख 40 हजार 234 मतांनी विजयी झाले.
शेवटच्या 26 व्या फेरीअखेर नामदेव किरसान यांना 6 लाख 14 हजार 610 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना 4 लाख 74 हजार 376 मते मिळाली. तर बसपाचे प्रा. योगेश गोन्नाडे 18 हजार 930 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
शिवाजीरावांना आस्मान दाखवलं! शिरुरमध्ये 1 लाखांच्या लीडने पुन्हा अमोल कोल्हेच…
तर ‘नोटा’ला 16 हजार 507 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी 15 हजार 824 मतांसह पाचव्या स्थानावर राहिले.
डॉ. किरसान यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. रोहित पवार यांनी देखील गडचिरोली जिल्ह्यात सभा घेतली होती. डॉ. नामदेव किरसान यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतचर विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात किरसान यांची शहरातून रॅली काढण्यात आली. किरसान यांच्या विजयामुळं कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.