चंद्रपूर कॉंग्रेसकडे, मुनगंटीवारांना दिल्ली दूरच! प्रतिभा धानोरकरांनी गड राखला

चंद्रपूर कॉंग्रेसकडे, मुनगंटीवारांना दिल्ली दूरच! प्रतिभा धानोरकरांनी गड राखला

Chandrapur Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विदर्भातही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. चंद्रपुरामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Mungantiwar) यांचा दणदणीत पराभव केला आहे.

राम मंदिर, कलम 370 … मात्र तरीही भाजपला धक्का, जाणून घ्या महत्वाची कारणे 

2019 मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकून काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली. त्यामुळे आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना या जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर धानोरकर आणि मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

प्रतिभा धानोरकर 2 लाख 60 हजार 410 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 तर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 4 मते मिळाली. उर्वरित 13 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. धानोरकर विदर्भात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या.

Lok Sabha Election Result 2024 : भिवंडीची महायुतीकडे पाठ? 7 वेळा पक्ष बदलणारे ‘बाळ्यामामा’ विजयी 

पक्षाच्या आदेशामुळ आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. आता ही जागा काँग्रेसने जिंकली असून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव झाला आहे.

खरंतर मुनगंटीवर हे चंद्रपूरचे पालकमंत्री होते. तसेच ते मंत्रीही होते. त्यामुळं त्यांनी केलेली विकासकामं ही त्यांची जमेची बाजू होती. तर बाळू धानोकरांच्या निधनामुळं प्रतिभा धानोरकरांना सहानुभूतीचा फायदा मिळाला.

दरम्यान, या विजयानंतर प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केला होता, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय मंत्र्यांचा पराभव केला होता. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. हा धानोरकर घराण्याचा इतिहास आहे, मंत्र्यांना पराभूत करणे, हा विजय इंडिया आघाडीचा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज