राम मंदिर, कलम 370 … मात्र तरीही भाजपला धक्का, जाणून घ्या महत्वाची कारणे

राम मंदिर, कलम 370 … मात्र तरीही भाजपला धक्का, जाणून घ्या महत्वाची कारणे

Lok Sabha Election Result 2024 : आज देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर होत आहे. मात्र या निकालात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला असून भाजपला बहुमत मिळवण्यासाठी देखील अवघड होत आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपने 400  पारचा नारा दिला होता मात्र आज जाहीर झालेल्या निकालात भाजपला बहुमत मिळताना दिसत नाही.

1 जून रोजी देशात लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए (NDA) सहज 350 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र तसा काहीच झाला नाही. यामुळे आता भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी बिहारचे मुख्यंमत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे मात्र भाजपला इतक्या कमी जागा का? मिळाले याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

गेल्या पाच वर्षात भाजपने अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण केला याच बरोबर कलम 370 रद्द केला मात्र तरीही निकाल भाजपच्या विरोधात जाण्याची कारणे कोणती होती ते जाणून घ्या.

अतिआत्मविश्वास

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला होता याच बरोबर जानेवारी महिन्यात राम मंदिराच्या उभारणीनंतर देशात निर्माण झालेला वातावरण भाजपच्या पक्षात जाणार असा विश्वास भाजपला होता मात्र हाच अतिआत्मविश्वास भाजपला बळी ठरला. यावेळी भाजपला उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या राज्यात भाजपला यश मिळणार असल्याचा विश्वास भाजपला होता.

राममंदिराच्या मुद्द्याचा काही फायदा झाला नाही

जानेवारी महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर देशात ही पहिली लोकसभा निवडणूक होती आणि या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा होती मात्र असे असतानाही यूपीमध्ये भाजपचे मोठे नुकसान झाले. निकाल पाहता भाजपला राम मंदिराच्या उभारणीचा फायदा झाला नसल्याचे दिसून येते. अयोध्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येते, तेथेही भाजप उमेदवाराचा पराभव झाला.

संविधान धोक्यात

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंडिया आघाडीकडून ‘आरक्षण, संविधान धोक्यात’ यामुळे भाजपला 400 पेक्षा जास्त जागा पाहिजे अशा मुद्यावर जोर देण्यात आला होता. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी विरोधकांच्या या मुद्याला छेद देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात त्यांना पूर्ण यश आले नसल्याचे दिसते.

अग्निवीरची अग्निपथ योजना, वारंवार पेपर फुटल्याने तरुणांमध्ये संताप!

देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपची अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी होत होती. यातच काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठा मुद्दा बनवला आणि सत्तेत येताच ही योजना संपवू, असे आश्वासन दिले. तसेच उत्तर प्रदेशात पेपर फुटणे आणि बेरोजगारी हा मोठा मुद्दा बनवत भाजप विरोधात राहुल गांधी यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये जोरदार प्रचार केला होता. यूपीमध्ये भाजपच्या निराशाजनक कामगिरीमागे हेही एक प्रमुख कारण असू शकते.

 मोदींच्या नावाने जिंकता येणार नाही

गेल्या निवडणुकीप्रमाणे देखील यावेळी भाजपने मोदी यांच्या नावावर मत मागितले होते मात्र यावेळी मोदी मॅझिक दिसून आला नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील यावेळी गेल्या वेळेच्या तुलनेत खूपच कमी फरकाने विजय झाला आहे.

ठाण्यात शिदेंच किंग! नरेश म्हस्केंचा दणदणीत विजय, उद्धव ठाकरेंना धक्का

तर दुसरीकडे, भाजपला यावेळी स्थानिक पातळीवर उमेदवारांविरुद्धचा जनक्षोभ महागात पडला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज